21 क. 36 मि. पर्यंत धनु राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे मकर राशीत मुले प्रवेश करतील. निर्धार आणि संपर्क यामधून मुले प्रगतीचा प्रवास सुरू ठेवतील. बालपणी आरोग्य आणि शिक्षण यात लक्ष असावे. पुढचा प्रवास बराचसा अनुकूल करता येईल.
धनु राशी भ, ध अद्याक्षर
मकर राशी ज, ख अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
रविवार, 6 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 14 आश्विन 1941
मिती आश्विन शुद्ध अष्टमी 10 क. 55 मि.
पूर्वाषाढा नक्षत्र 15 क. 03 मि. धनू चंद्र 21 क. 36 मि.
सूर्योदय 06 क. 31 मि., सूर्यास्त 06 क. 22 मि.
दूर्गाष्टमी
दिनविशेष
1893 - खगोल भौतिक या विषयामध्ये ख्याती मिळवणारे थोर शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचा जन्म.
1913 - कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा जन्म.
1943 - समीक्षक व संशोधक डॉ. रत्नाकर मंचरकर यांचा जन्म.
1946 - भारतीय चित्रपट क्षेत्रातील नामवंत अभिनेते आणि खासदारपद भूषिवलेले विनोद खन्ना यांचा जन्म.
1974 - भारताचे माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे निधन.
1979 - मराठी इतिहास संशोधक, लेखक दत्तो वामन पोतदार यांचे निधन.