Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 15 जानेवारी 2020
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 10:51 IST2020-01-15T10:48:33+5:302020-01-15T10:51:11+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 15 जानेवारी 2020
सिंह राशीत जन्मलेली मुलं ११ क. २८ मि. पर्यंत राहतील. पुढे मुले कन्या राशीत समाविष्ट होतील. प्रयत्न ते प्रगती यांच्यामध्ये शुक्र-हर्षल शुभयोग संधी ते सफलता यांच्यामध्ये आकर्षकता निर्माण करील. माता-पित्यास शुभ. सिंह राशी म, ट. कन्या काशी प, ठ, ण अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, 15 जानेवारी 2020
भारतीय सौर 25 पौष 1941
मिती पौष वद्य पंचमी 12 क. 11 मि.
पूर्वा नक्षत्र, 05 क. 57 मि., सिंह चंद्र 11 क. 28 मि.
सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 20 मि.
मकरसंक्रांत
दिनविशेष-
1921- माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म
1926- भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म
1929- गांधीवादी नेता मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्म
1956- भाषाशास्त्रज्ञ तारपोरवाला इराच जहांगीर सोराबजी यांचं निधन
1971- चित्रकार दीनानाथ दामोदार दलाल यांचं निधन
2013- जागतिक कीर्तीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र दामोधर गोखले यांचं निधन
2014- कवी, लेखक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचं निधन