शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मनाच्या एकाग्रतेमधूनच शोधाचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 06:29 IST

आपल्या सर्जनशीलतेला अथवा संशोधकवृत्तीला मारक ठरतील अशा गोष्टींपासून ते आपले मन दूर ठेवतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजएखादा शोध लागणे, त्याची योग्यता तपासणीसाठी चाचणी घेणे, हे खरे म्हणजे अनोळखी वाटेवरून चालण्यासारखे असते. प्रयोगशाळेत त्याचे मन लागते की नाही, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कोणताही शास्त्रज्ञ एखादा शोध लावतो, तेव्हा त्याचे मन त्या उपक्रमाशी एकरूप झालेले असते. रात्रंदिवस त्याच्या मनात तोच प्रयोग सुरू असतो. आपले संशोधन नवीन आणि सर्वाेत्तम कसे असेल, याच ध्येयाने तो झपाटलेला असतो. त्यामुळेच जगामध्ये उत्तम शास्त्रज्ञ तयार झाले आहेत. शास्त्रज्ञ हा स्वत:च्या संशोधनात मनापासून रममाण होतो. त्यामुळे त्याची झोप कमी होते. त्याचे संपूर्ण लक्ष आपल्या संशोधन प्रक्रियेकडे लागलेले असते. ठरावीक गोष्टी सोडल्या तर त्याचे मन त्यातच रममाण असते. आपल्या कामात त्याने स्वत:ला गुंतवून घेतलेले असते. नवीन नवीन संशोधन करून देशाच्या हितासाठी त्याचा उपयोग व्हावा हीच त्याची अपेक्षा असते. तीच त्याची देशसेवा असते. शास्त्रज्ञ हे संधीचे आणि वेळीचे सोने करतात. नियोजन आणि चिकाटी हे त्यांचे अंगभूत गुण असतात. त्यांचे मन हव्या असलेल्या माहितीचे संदर्भ शोधण्यात पटाईत असते. आपल्या सर्जनशीलतेला अथवा संशोधकवृत्तीला मारक ठरतील अशा गोष्टींपासून ते आपले मन दूर ठेवतात. कारण संशोधनाचा मोठा प्रभाव संपूर्ण जगावर तसेच कित्येक पिढ्यांवर पडणार असल्याची जाणीव त्यांना असते. त्यामुळेच आपल्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तो सतत मग्न असतो. वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्याच्या मनामध्ये उत्सुकतेचे वातावरण तयार होते. सगळेच शास्त्रज्ञ विशिष्ट रीतीने प्रयोग करीत असतात. प्रयोग करताना त्यांना वेळेचीसुद्धा मर्यादा राहात नाही. त्यांच्या वेळेनुसार ते अधिक काम करतात. ते नेहमी वेगाने काम करतात. आपल्या निर्मितीवर ते नेहमीच पूर्णपणे लक्ष ठेवून असतात. जगाला काय हवे आहे, याचा ते अंदाज घेत असतात. त्यामुळेच जगात नवे शोध लागत असतात.

विविध शोधांमुळे क्रांतिकारी बदल घडत आहे, याचे कारण शास्त्रज्ञांची जिज्ञासा, प्रयोगशीलता, चिकाटी हे गुण महत्त्वाचे असतात. संशोधन करून एखादा शोध लागला की, तो शास्त्रज्ञ लोकप्रिय होतो. त्याचे जगभर कौतुक होते. कोणताही शास्त्रज्ञ कशावरून तरी प्रेरणा घेत असतो. त्यानुसार आपल्या कृतीमध्ये बदल करीत असतो. शास्त्रज्ञ अपयशाला कंटाळत नाहीत, आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करणे सोडत नाहीत. त्यामुळे वेगवेगळी कौशल्ये असलेला कुशल संशोधकांचा एक गट तयार होतो. त्यामुळे इतरांना प्रेरणा व नवीन दिशा मिळते. शास्त्रज्ञांचे मन शांत व जिद्दी असते. एकाग्र मनामधूनच शोध लागतात.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक