शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नाडी शोधन साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 2:53 AM

शरीर अशक्त असलेल्यांनी नाडी अवरोध, भस्त्रिका, एकाग्ड.-स्तंभ, सर्वांगस्तंभ, मुख-प्रसारक पूरक, हृदय-स्तंभ, अग्नी-प्रदीप्ति तसेच वायवीय कुंभक ही आसने करू नयेत.

- डॉ. विजय जंगम (स्वामी)

शरीर अशक्त असलेल्यांनी नाडी अवरोध, भस्त्रिका, एकाग्ड.-स्तंभ, सर्वांगस्तंभ, मुख-प्रसारक पूरक, हृदय-स्तंभ, अग्नी-प्रदीप्ति तसेच वायवीय कुंभक ही आसने करू नयेत. अर्थात ही आसने शिकली नसतील तर प्रश्नच येत नाही. पित्तप्रकृतींनी भस्त्रिका प्राणायाम करू नये, त्याने पित्तप्रकोप वाढतो. वात कफ नाहीसा होतो.सूर्यभेदन, भस्त्रिका एकाग्ड., स्तंभ, सर्वांगस्तंभ, नाडी अवरोध, मुखप्रसारण पूरक आणि अग्नी प्रदीप्ति हे प्राणायाम उन्हाळ्यात करू नयेत. पण कफ प्रकृती प्रधान असलेल्या व्यक्तींनी टेकडीवर, उंच पर्वतावर (म्हणजे उत्तुंग इमारतींच्या वरच्या मजल्यावरील जागेत) जाऊन ही आसने केली तर कोणताच त्रास वा कोणतीही हानी होणार नाही.थंडीच्या काळात सीत्कारी, शीतली, चंद्रभेदी, शीतकार प्राणायाम निषिद्ध आहेत. पित्तप्रकृतीप्रधान व्यक्तींनी थंडीत उपरोल्लेखित आसनं करायला हरकत नाही. वातप्रकृतींनी शीतली, प्लाविनी, उदरपूरक, शीतकार, सीत्कारी, कण्ठवायू-प्राणायामांना रजा द्यावी. शीतली प्राणायाम पित्तशामक आहे. पूरक केल्यानं उष्णता आणि पित्त वाढतं. पूरकानंतर अभ्यंतरकुंभक केल्यानं पित्तवृद्धी होते. वात आणि कफ प्रकृती व्यक्तींनी हा प्राणायाम अवश्य करावा. यात रेचकानं सर्वदोष निवारण होतं. प्रकृती आणि ऋतुकाल बंधन नाही.ही साधना गुरुसान्निध्य, गुरुमार्गदर्शनानेच मिळणारी असल्यानं निव्वळ पुस्तकी ज्ञानावर विसंबू नये. किंबहुना हा लेख पूर्ण अष्टांग योगस्पर्शी न करण्याचं ते एक महत्त्वाचं कारणही आहे. वाचक श्रद्धेने वाचतात. वाचल्याप्रमाणे करू पाहतात. त्यात चुका होतात. त्या नुकसानकारी होणार असतील तर लेख/पुस्तक यातून अशा क्रियांचं वर्णनच करू नये; हा प्राचीन गुरुदण्डक पाळणं श्रेयस्कर नव्हे काय?मात्र नाडीपुज्ज शुद्ध झाल्याशिवाय प्राणायाम सफल होत नाही म्हणून तिथे थोडेफार विवेचन केले. मात्र त्यातून कोणी परस्पर नाडीशोधन प्रयोगात पडू शकणार नाही, इतपत काळजी घेतली. प्राणप्रवाह ब्रह्मरंध्रापावेतो पोहोचला की नाडीपुज्ज मलरहित होऊन शुद्ध प्राणप्रवाह शरीरभर खेळतो.तथापि वाचकांना निराश, नाराजही करायचं नसल्यानं काही सोप्या क्रियांचा ऊहापोह येथे करू या.१) दोन पायांत १० ते १२ इंच अंतर ठेवून समभार सरळ, ताठ उभे राहावे. छाती पुढे, मान ताठ ठेवून हनुवटी थोडी आत घेऊन हात जांघांना चिकटवून ताठ उभे राहावे. सावकाश, खोल श्वास घ्यावा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक