शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

विचारे दृढता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 05:02 IST

विचार ही एक शक्ती आहे आणि ती माणसाशिवाय कुठल्याच सजीव प्राण्यात नाही.

- बा.भो. शास्त्री‘आचारे योग्यता’ यावर आपण चिंतन केलं आहे. आता सूत्राचा उत्तरार्ध ‘विचारे दृढता’ यावरचं चिंतन करूया. विचार ही एक शक्ती आहे आणि ती माणसाशिवाय कुठल्याच सजीव प्राण्यात नाही. हीच त्याची विशेषत: आहे. म्हणून तोच नराचा नारायण होतो. आचारासारखी विचारात शक्ती असते. एकीने योग्यता तयार होते व दुसरीने कोणता लाभ होतो हे आपण पाहणार. अप्राप्ताची प्राप्ती हा योग आहे व त्या योगची यथास्थिती ठेवण्यासाठी त्या शक्तीला दृढता किंवा दक्षता म्हणतात. या विकासात्मक शक्ती मानवाला उन्नत करतात. आचार सन्मार्गावर व विचार तोल सांभाळतो. कर्म गती देतं. आयुष्याच्या रस्त्यावर जी धोकादायक वळणं असतात, तेथे क्षणभर दक्षता ढळली तर अपघात होण्याची शक्यता असते. तरीच चालायला गती व न चुकायला मती लागते. थोडं जरी बेसावध असलं तर भल्याभल्यांचे अपघात होतात. म्हणून त्यात सातत्य हवं आहे. संत तुकोबा म्हणाले,‘क्षणोक्षणी हाचि करावाविचार तरावया पार भवसिंधू’हा विचार शाश्वताचा-अशाश्वताचा आहे. संसार-परमार्थाचा आहे. धनाचा-मनाचा-तनाचा आहे. संकल्प विकल्पात्मक असलेल्या चंचल मनाला सतत हेलकावे बसतात. म्हणून दृढनिश्चयाचा विचार स्वामी सांगतात. नसुद्ध वीरत्व कामाचं नाही. त्याने विचलित होऊ नये म्हणून त्याला धैर्याची सोबत असावी लागते. महानुभाव कवी केशिराज म्हणतात-मी प्रवर्तला परमार्गीतव महाविघ्नी केली लागीलेवूनी विचाराची वज्रांगीप्रबोधु परसे पराभविलीते म्हणतात, माझ्यावर अविचाराने संकट आणलं होतं. त्याचा मी विचार-शस्त्राने पराभव केला. कालिदासात तोडता येत होतं, पण कुठं उभं राहून तोडावं हे कळत नव्हतं. पुढे तोच विचारशक्तीने महाकवी झाला. विचाराचं शस्त्र अपात्रतेच्या हाती जायला नको. अश्वत्थामाला ब्रह्मास्त्राचं ज्ञान होतं, पण त्याचा कधी कशासाठी वापर करायचा याचा विवेक नव्हता. आज विचारवंतांना अशीच भीती अण्वस्त्रांबाबत सतावत आहे. कृतीचा परिणाम ज्याला कळतो, तोच विचारवंत असतो. यासाठी सामर्थ्य असायला पाहिजेच, पण त्याला विवेकाचं अधिष्ठान असावं लागतं. संयमाचा ब्रेक हवा. लगामाशिवाय घोडा व विवेकाशिवाय माणूस हा वेडाच असतो. मोबाइलचं सामर्थ्य चांगलं, तो गरजेचा आहे. पण त्याचा वापर करायला विवेक लागतो. अन्यथा बरबादी पण होऊ शकते. तारुण्य, धन, प्रभुत्व व अविवेक या चार अपघाताच्या जागा असल्याचं शास्त्र सांगतं. यापैकी एकच रसातळाला नेऊ शकतं. जर चारही उपलब्ध असले तर रावणही मारला जातो. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या साहित्यात श्रोत्यांची मनधरणी करून विवेकाची पेरणी केली आहे. आधी त्यांचे कान तयार केले. नंतर शब्दब्रह्माचा रस त्यात ओतला. शके ११४१ मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं त्यांनी अंतर्बाह्य सूक्ष्म निरीक्षण केलं. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो यावर माणसाचा विश्वास होता. जनावरांना गोंजारतो व माणसांना अस्पृश्य म्हणतो. स्त्रियांना धर्मापासून वंचित ठेवून’ प्राण्यांचे बळी देणारा मानव दिसला.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक