शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
2
"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
3
आता भारतावर थेट 500% टॅरिफ लावणार ट्रम्प...! पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
4
Post Office च्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळेल ५५५० रुपये निश्चित व्याज; कोणती आहे स्कीम, पाहा
5
तिलक वर्माची अचानक तब्येत बिघडली; तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची वेळ! नेमकं काय झालं?
6
सारा तेंडुलकर मराठीत बोलली, आजीची गोड आठवण सांगितली; Viral Video पाहून नेटकरी फिदा
7
जगातील सर्वात 'बलाढ्य' विरुद्ध सर्वात 'कमकुवत' चलन; यांच्यासमोर अमेरिकी डॉलरही फिका
8
बँक ऑफ बडोदामधून ₹५० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी? EMI किती असेल, पाहा
9
ढाका हादरलं! भरचौकात माजी नेत्याची निर्घृण हत्या; बांगलादेशात लष्कर तैनात, रस्त्यावर राडा
10
लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...
11
'गृहिणी म्हणजे घराचं मॅनेजमेंट सांभाळणारा बिनपगारी जॉब, फक्त लक्षात ठेवा 'ही' एक गोष्ट!'-सद्गुरु
12
१० मुलींच्या जन्मानंतर ११वा मुलगा झाला! जन्मदाता पिता मात्र बेरोजगार; मनातील भावना सांगताना म्हणाले.. 
13
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
14
अमेरिकेत नोकरी हवीय? एका प्रश्नाने उडवली भारतीय विद्यार्थ्यांची झोप; न्यूयॉर्क टाइम्सचा मोठा खुलासा!
15
₹३,०००, ₹५,०००, ₹८,००० आणि ₹१०,००० च्या गुंतवणुकीवर किती रिटर्न? १५ वर्षांत किती जमेल फंड, जाणून घ्या
16
मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकरांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...
17
"भगत सिंगांनी काँग्रेस सरकारवर बॉम्ब टाकला"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा, ऐतिहासिक चुकीमुळे भाजपची नाचक्की
18
कलयुगी लेक! प्रियकरासाठी बापाचाच काटा काढला; आईनेही दिली साथ, 'त्या' हत्येचं असं उलगडलं रहस्य
19
बनावट FASTag Annual Pass द्वारे नवीन फ्रॉड, NHAI ने दिला इशारा; कसं वाचाल, जाणून घ्या
20
"मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथं काय हवं हे कळणार नाही"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग- जाणतेया विखो सुखाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 03:33 IST

जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात.

बा.भो. शास्त्रीस्वर्ग व नरक हे दोन शब्द सर्वांनाच ठाऊक आहेत. स्वर्गाची प्रीती तर नरकाची भीती वाटते. स्वर्ग हा शब्द सुख, तथा फळा वाचक आहे. तर नरक हा दु:ख व क्लेश वाचक आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. कमीत कमी दु:ख म्हणजे सुख आणि कमीत कमी सुख म्हणजे दु:ख असं सुखदु:खाचं स्वरूप आहे. गीतेने संसाराला ‘दु:खालय’, बुद्धाने ‘सब्बंंदु:ख’ म्हटलं आहे. सुख सर्वांनाच हवं असतंं. दु:ख कुणालाच नको असतं. पण हवं ते मिळत नाही. नको ते टळत नाही. कोण देतं ते? कुणी नाही. आपणच निर्माण करीत असतो. सत्कर्माने स्वर्गसुख, तर दुष्कर्माने नरकाची प्राप्ती होते, हे शास्त्र सांंगतंंं. स्वत:च्याच कर्माचंं बरंं-वाईटाचंं फळ स्वत:लाच भोगावं लागतं. ‘आम्ही सुखी आहोत’ असं म्हणणारे लोक खरंच सुखी असतात का? याचं उत्तर सर्वच साक्षात्कारी संंत व श्रीचक्रधरस्वामी नकारार्थी देतात. मग आपण सुख अनुभवतो ते काय आहे? ते दुधातल्या पाण्याला दूध समजतो, तसंं आपण दु:खालाच सुख समजतो. समजा सुख हे दु:खमिश्रित असतंं. सुखात धास्ती तर आनंदात मस्ती असते. जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात. जगात आज तर शुद्ध काहीच भेटत नाही. कुठलाच खाद्यपदार्थ, पेण, पाणी, हवा, विचार, आचार, मित्र, सोयरे, केळंं, आंंंबा, किंबहुना विषातही भेसळ असते. म्हणून आमच्या सुखालाही वेदना असतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘‘जिये लोकिचा चंंद्रु क्षयरोगीजिथंं उदयो होय अस्तालागीदु:ख लेवून सुखाचा अंंगी, सळित जगाते’’चांंगल्या कपड्यांमुळे माणूस सुखी आहे असं वाटतंं, असंच दु:खाने सुखाचा अंगरखा घातला की दु:खही मोहक वाटतं, पण सर्व जगाला छळत आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक