पौष मास म्हटलं की थंडीचा गारठा, धुक्याची शाल लपेटलेली वसुंधरा नजरेसमोर येते. सूर्यनारायणाचं महत्त्व अधोरेखित करणारा पौष! प्रत्येक रविवारी दिनकराचं पूजन करणारी परंपरा. पंचमहाभूतापैकी एक तेजस तत्त्वाचा अधिपती असणारा सूर्य. ...
संत ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणे कोरान्न घेऊन घराच्या अंगणात आले होते. ज्ञानेश्वरांनी निमूटपणे आपली झोळी मुक्तेच्या हाती दिली पण त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. नेहमीच्या त्यांच्या हसतमुख चेह-यावर क्रोध होता, उद्विग्नता होती; उदासीनता होती. ...
माणसाच्या जीवनात ‘अभ्यास’ हा शब्द वेगवेगळ्या अंगाने जोडला गेला आहे. मुलाला शाळेत घातल्यापासून त्याचं आणि अभ्यासाचं नातं जडलं जातं. ‘तुला आता अभ्यास करायचाय, परीक्षा जवळ आलीय, काय करावं मुलगा सारं काही करतो पण अभ्यास मात्र करत नाही. ...
परमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायची सोय ठेवली नाही. एकट्याने यायचे-एकट्याने जायचे. जगताना माझे माझे म्हणायचे. वरती सोबत काहीच नेता येत नाही. सारे इथेच सोडून जायचे. ...
सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते. ...
निसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधावेयाचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र. पुर्वी माणुस जंगलात ,शेतामध्ये , डोंगरात रहायचा म्हणजे निसर्गाच्या जवळ राहायचा ऊन , वारा , पाऊस , मोकळी हवा या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक त्या मिळायचा त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले ...
डोंगर रांगांमधून नागमोडी वळणाची पाऊलवाट जाते तेव्हा पांथस्थ, वाटसरू सांभाळून मार्गक्रमण करतात. सावधपणानं सर्वत्र नजर फिरवून दूरवर चालत गेलं की मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाणं शक्य होतं. ...
जपानमध्ये मेईजी कालखंडात केईचू नावाचे एक झेन गुरू होते. क्योते मधल्या तोफुकू या आश्रमाचे ते प्रमुख होते. एकदा क्योतो प्रांताच्या गव्हर्नरना केईचूना भेटण्याची इच्छा झाली. ती त्यांची पहिलीच भेट असणार होती. ...
भागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना. ...