शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नाममात्र कर्म आपुलियाच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 7:31 PM

वास्तवाचे भान ठेवत स्वत्वाची ओळख करुन घेतल्यास प्रगती साधली जाते.

- डॉ भालचंद्र ना. संगनवार

उत्कटतेतून उन्नतीकडे आणि सदाचारातून सद्गतीकडे मार्गक्रमण सहज शक्य आहे. माणसाच्या प्रगतीआड येणारे षडरिपू ईश्वरभक्तीने कमी केले जाऊ शकतात. दांभिकपणा कमी करुन वास्तवाचे भान ठेवत स्वत्वाची ओळख करुन घेतल्यास प्रगती साधली जाते. स्वत:मधील न्यूनगंड कमी करुन ओळख निर्माण केली जाऊ शकते ग.दि. माडगूळकर यांनी याचे वर्णन अत्यंत बोलक्या शब्दात केले आहे, एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले, पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक स्वत:च्या मर्यादा लक्षात घेऊन कामास सुरुवात केली़ तर निराशा हाती येत नाही. प्रत्येकात बहूतांश चांगले तर काही प्रमाणात अवगूण असतात. ईश्वरभक्तीने अवगूण कमी होऊन सदगूणात वाढ होते हे नव्याने सांगणे नको. ममत्व आणि समत्व गूणांची वाढ झाल्यास सूखी समाज निर्माण होण्यास वेळ लागत नाही. निर्जीव वस्तूत देखील सजीवांच्या प्रतिकृतींची अनूभूती घेणे हे आपले संस्कार आहेत यालाच श्रद्धा असे म्हटले जाते. तूच कर्ता आणि करविता या विश्वासातून भगवंताला समर्पित होणारे आत्मीक सूख उपभोगताना दांभिकतेने केलेले काम हे केव्हाही आत्मसूख अथवा प्रगती साध्य करु देत नाही.

निष्काम कर्मभोग हा मानवाला प्रगतीकडे घेऊन जातो असे म्हटले जाते परंतू सद्यस्थितीत इच्छेखातर कार्य आणि कार्यांतुन निर्वाह असे सूत्र अवलंबिले जात आहे. त्यामूळे इच्छेने फळ प्राप्त झाली नाही तर निराशेच्या प्रवृत्ती बळावत आहेत. त्यामूळे अल्प कालावधीत उत्तुंग व कोटीच्या कोटी उड्डाने मारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. त्यामूळे आनंदाचा उपभोग घेण्याऐवजी दूखा:चे वातावरण निर्माण होते. त्यास्तव संताचा उपदेश अत्यंत योग्य असून ते सांगतात,करु नको खेद कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसेसर्व काही विधात्याच्या अधिन असले तरी नाममात्रे कर्म हे आपल्या हाती ठेवले आहे. निष्ठेने कर्म करणे म्हणजेच ईश्वरनिष्ठा होय. अगम्य ज्ञानाची प्रचीती घेऊन समाजाचे देणे फेडले जाऊ शकते परंतू तशी आंतरिक तळमळ आवश्यक आहे. विविध क्षेत्रात उत्तूंग शिखर गाठणारा आधूनिक कित्येक ज्ञानराज या समाजात वावरत आहेत. निष्ठेने केलेले कार्य हे देशकार्यच असून या मातेची सेवा केल्याचे समाधान यातून लाभते. आपणास बोध घेता येईल असे कित्येक महानुभव या भूमीत निर्माण झाले. त्यांचा वारसा चालविणे ही काळाची गरज आहे. भागवत धर्माची पताका उंच ठेवत सन्मागार्ने कार्य करणाऱ्याची गरज जास्त आहे. ईहलोकांचा प्रवास हा भौतिकवादास चिकटून न राहता विशेष कार्यास अर्पण करण्यासाठीचा आहे. निसर्ग, प्राणी, पक्षी याचे हे उत्तम उदाहरण आहे.

( लेखक हे लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक