शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती नऊ दिवसांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 05:46 IST

आपल्या देशात भक्तीची परंपरा आहे. कॅथोलिक ख्रिस्ती धर्मातही भक्तीचे विविध प्रकार आहेत. नऊ दिन (नोव्हेना) हा त्यातला एक प्रकार. ...

आपल्या देशात भक्तीची परंपरा आहे. कॅथोलिक ख्रिस्ती धर्मातही भक्तीचे विविध प्रकार आहेत. नऊ दिन (नोव्हेना) हा त्यातला एक प्रकार. येशुमाता मरियेची भक्ती त्या दिवसात केली जाते. त्या भक्तीत सामुदायिक प्रार्थनेनंतर मूकपणे वैयक्तिक प्रार्थना केली जाते. मरियेच्या तसबिरीसमोर फुले, मेणबत्त्या वाहतात. मुंबईत माहीमला संत मायकल चर्चमध्ये दर बुधवारी पवित्र मरियेच्या भक्तीला सर्वधर्मीय श्रद्धावंत हजेरी लावतात. अशीच भक्ती सप्टेंबर महिन्यात वांद्र्याला मोतमावलीच्या समोरही पाहावयास मिळते. या नऊ दिन भक्तीसाठी स्त्रियांचा सहभाग अधिक असतो. याचे कारण स्त्रीच्या विशिष्ट मानसिकतेत आहे. स्त्री जणूकाही संपूर्ण कुटुंब आपल्या हृदयात वागविते. आपला पती, आपली मुले, सासू-सासरे, कुटुंबाचे विविध प्रश्न या सगळ्यांचा भार ती मनात वाहते. त्यात मनाने ती गुंतलेली राहते. त्या प्रत्येकाचे हित ती पाहते. घरातील लेकराबाळांसाठी तिचा जीव तुटत राहतो. हे सगळे तिला सुरळीत व्हायला हवे असते. हा सर्व भार ती माऊलीच्या पायाशी वाहते. थोडा विचार केला तर तिचे हे समर्पण तिच्या नकळत तिला मानसिक, शारीरिक आरोग्यही पुरवत असते. स्त्री भावनिक असते. लहानसहान प्रसंगांनी तिला वेदना होतात. तिचे डोळे भरून येतात. मात्र पुरुषाप्रमाणे तो कढ दाबून न टाकता ती तो वाहू देते. स्वत:ला मोकळे करते. मनावरचे मळभ उतरते. मन नितळ होते. त्यामुळे शरीरही निकोप राहते. मरिया माऊलीपुढे आपल्या व्यथावेदना ठेवताना हेच होत असते. ती भारमुक्त होत असते. मरिया माऊलीला स्त्रिया आईच्या रूपात पाहात असतात. कोवळ्या तारुण्यात लग्न झालेले असते. आईच्या पदरात सुरक्षित ऊबेतून ती सासरच्या घाण्याला जुंपलेली असते. भक्तीचे नऊ दिवस मायभगिनी व्यथा वेदनांचा भार माऊलीच्या पुढ्यात ठेवतात. त्या भक्तीतून स्त्रिया स्वत:साठी बळ एकवटतात आणि पुन्हा संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपतात. जणू श्रद्धा जगत असतात.- फा. फ्रान्सिस दिब्रिटो