शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Navratri : दुर्गे शक्तिरूपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 05:31 IST

समर्थांनी ‘शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदंतरी’ असे म्हणत देवीस्वरूपाची व्यापकता स्पष्ट केली आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

- शैलजा शेवडेसमर्थांनी ‘शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदंतरी’ असे म्हणत देवीस्वरूपाची व्यापकता स्पष्ट केली आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दुर्गा म्हणजे दु:ख दूर करणारी. तिची नऊ रूपे वर्णन करणारी कविता मी केली आहे.भावभक्तीने भिजतो तुजला, दुर्गे, शक्तीरूपे,करीन जप तव नामांचा मी, निश्चित गूढ रूपे ।शैलपुत्री तू, वृषारूढा, प्रथम तुला नमितो,शूलधरा, तू, अनंतशक्ती, कृपा तुझी इच्छितो ।ब्रम्हचारिणी, तव करकमली, कमंडलू अक्षमाला,तेजोमयी तू सर्विसद्धी दे, निश्चय दे आम्हाला।चंद्रघंटा सिंहारु ढा, खड्गधारी, स्वर्णमयी,अर्धचंद्र शिरी घंटाकारी, दशभूजा शुभमयी।कुष्माण्डा तू, ब्रम्हांडाला हास्यातून निर्मिसी,अष्टभुजा, सिंहारु ढा, व्याधी नष्ट करसी।स्कंदमाता, सिंहासनी तू, स्कंदासह बसशी,शुभ्रवरणा, चतुर्भुजा तू, यश आम्हां देसी।कात्यायनी तू पापहारिणी, अमोघफलदायिनी,अभय देसी, भक्तांना तू, शार्दुलवरवाहिनी ।कालरात्री, तू गर्दभवाहिनी, त्रिनेत्रा कालिके,रूप भयंकर, परी भक्तांना भयमुक्त करते।महागौरी तू अष्टवर्षा, श्वेता, श्वेतांबरा,पूर्वसंचित पाप हरसी, सौम्या, अश्वारूढा।सिद्धीदात्री, हाती तव,गदा, पुष्प,शंख चक्र ,पूर्ण करसी कामना, हो परिमसद्ध साधक।साधक नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उपासनेला, साधनेला प्रारंभ करतात. पहिल्या दिवशी मूलाधार चक्रात आपल्या मनाला स्थिर करतात. शैलपुत्रीला आवाहन करतात. दुसऱ्या दिवशी स्वाधिष्ठान चक्रात स्थिर करणाºयावर ब्रम्हचारिणी या रूपाची कृपा होते. तिसºया दिवशी दुर्गेच्या तिसºया रूपाचे, शक्तीचे साधकाकडून पूजन होते. त्याचे मन मणिपूर चक्र ात प्रविष्ट होते.

टॅग्स :Navratriनवरात्रीAdhyatmikआध्यात्मिक