शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

श्रद्धा ठेवून भगवंतांना जाणून घेण्यासाठी नामसाधना महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 11:22 PM

भगवंताची कृपा झाली, तरच भगवंतांचे समग्र देखणे रूप आणि ब्रह्मांडव्यापी स्वरूप जाणिवेच्या ज्ञानपातळीवर प्रत्यक्ष अनुभवता येते.

- वामन देशपांडेभगवंताची कृपा झाली, तरच भगवंतांचे समग्र देखणे रूप आणि ब्रह्मांडव्यापी स्वरूप जाणिवेच्या ज्ञानपातळीवर प्रत्यक्ष अनुभवता येते. या विश्वात एक भगवंत अस्तित्व सत्य आहे आणि यावर श्रद्धा ठेवून भगवंतांना जाणून घेणे, ही खरी साधना आहे. त्यासाठी नामसाधना अत्यंत महत्त्वाची... मुखात भगवंतांचे नाम जर अष्टौप्रहर झंकारत असेल, तर भगवंत अस्तित्वाशी आपली नाळ जोडली जाते. भगवंतांशी आपले सख्य जुळून येते. भगवंत म्हणतात...मच्चित्ता मदगतप्राणा बोधयन्त: परस्परम्।कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च स्मन्ति च ।।गीता :१0:९।पार्था, हे संपूर्ण विश्व माझ्यापासून निर्माण झालेले आहे, हे विश्व मीच निर्माण केलेले आहे, माझ्या इच्छेनेच या विश्वातले सर्व व्यवहार चालतात, म्हणजे या प्रगट विश्वाच्या मुळाशी मी आहे, हे पूर्णपणे ज्ञानपातळीवर जाणून, जे परमभक्त आपले चित्त आणि आपला प्राण मलाच अर्पण करतात, हे सर्व परमभक्त आपापसात माझ्या या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची जाणीव एकमेकांना प्रेमाने कथन करीत, सदैव माझ्याच अस्तित्वाशी एकरूप होत, पूर्ण समाधानी, तृप्त आयुष्य जगत राहतात, माझ्यातच रमतात, त्यांना या मर्त्य विश्वातल्या मर्त्य गोष्टींची जाणून घेण्याची इच्छाच होत नाही. अविचल भक्तीच्या साहाय्यानेच भगवंतांची प्राप्ती होते. परमभक्तांचे अवघे अस्तित्व भगवंतमय झाले की, त्यांचे चित्त भगवंत चरणांशी स्थिर होते.भगवंत अर्जुनाला म्हणतात की,तेषां सततयुक्तानां भजनां प्रीतिपूर्वकम्।ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते।।गीता १0 :१0।।पार्था, माझ्या नामसाधनेत निरंतर मग्न असणाऱ्या, माझ्या परमभक्तांचे चित्त आणि मन मी सांभाळतो. मानवी जीवनातील शरीरभाव उत्पन्न करणारी द्वंद्वात्मक जीत मी नष्ट करून, त्यांच्या चित्तात समभाव निर्माण करणारी बुद्धी मी त्यांना अर्पण करतो. त्याचा सोपा अर्थ असा की, जे जे काही घडले, ते ते भगवंतांनीच दिलेला हा प्रसाद आहे, ही तीव्र जाणीव प्रत्येक क्षणी त्यांच्या भक्तिभरल्या अंत:करणात स्फुरण पावत राहते. त्यामुळे समत्व पावलेले मन, आनंदी अंत:करण त्या माझ्या परमभक्ताना माझी प्राप्ती करून देते. सर्व काही वासुदेवच आहे, हा सदभाव जागृतावस्थेत सळसळत राहणे, हीच खरी साधकाची भक्तिभारली साधना आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक