शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आईचं अध्यात्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:16 IST

लहान मूल हे ओली माती असते. त्याला विखारी साप बनवायचं की शांतीमय बुद्ध बनवायचं हे फक्त आईच्या हाती असतं.

- विजयराज बोधनकरती आई कठोर होती. तिने मुलाला कठीण प्रश्नांची उत्तरे शोधायला भाग पाडले. स्वातंत्र्याची आणि स्व-तंत्राची गणिते सोडवायला भाग पाडले. शक्तीचे, बुद्धीचे, चातुर्याचे सर्व अध्याय तिने त्याला कोठून पाजले? आईच्या कठोर शिक्षण संस्कारामुळे मुलगा स्वत:च्या प्रेमात न पडता स्वातंत्र्याची रणनीती आखू लागला. स्वातंत्र्याचं अध्यात्म आईच्या पावलावर मस्तक ठेवून आत्मसात करू लागला. पुस्तकातलं अध्यात्म बाजूला सारून कर्माचं अध्यात्म जाणिवेच्या स्पर्शातून अनुभवू लागला. शरीर, मन, बुद्धी या निसर्गदत्त देणगीला समईतल्या ज्योतीसारखं जपू लागला. आतून मिळणाऱ्या उत्तरांवर आईसारखं प्रेम करू लागला. आजूबाजूचे पंचांगातले शकुनी त्या मुलाने कधीच पायाखाली चिरडले आणि पंचांगापेक्षा पंचमहाभुतांच्या पायावर त्याने शरणागती पत्करली. आत्मबळाची त्याला प्रचिती आली. आईच्या कठोर शिक्षणाचा अर्थ फक्त अर्थकारणासाठी, स्वार्थकारणांसाठी न वापरता राष्ट्रहिताच्या विकासासाठी विचारात घेऊ लागला. इथला प्रत्येक जीव सत्याच्या बाजूने लढला तर बलाढ्य शत्रूही हार पत्करून सत्याच्या पायावर लोळण घेईल अशी ती महान आईची शिकवण त्या मुलाने आचरणात आणली, प्रत्यक्षात उतरवली. लहान मूल हे ओली माती असते. त्याला विखारी साप बनवायचं की शांतीमय बुद्ध बनवायचं हे फक्त आईच्या हाती असतं. तिची फक्त नाळ जर शाश्वत विचारांची असेल तर शब्दांपलीकडचं अध्यात्म फक्त कृतीतून ती नक्कीच जन्मास घालू शकते. आई हा असा एक पवित्र ध्वनी आहे जो ओमकाराच्या पवित्र लहरीइतकाच सत्शील आहे. विश्वव्यापी आहे. आई हे प्रेमळ सूत्रही आहे. आई एक दिव्य शस्त्रही आहे. पण आज आईची गुणसूत्रंच बदलली आहेत. नव्या विचारांच्या स्त्रीमनाला अघोरी शक्तीने गिळंकृत केलं आहे. आईच्या विचारांची बैठकच आज चंचलतेच्या वृत्तीतून वेगवान प्रवासकर्ती बनलीय, पण ज्या आईने कठोर बनून ज्या मुलाला घडवलं तशी आई आणि तसा मुलगा आज जन्माला येऊ शकेल काय? ज्या आईने ज्या मुलाला घडवलं तिचं नाव होतं जिजाबाई आणि जिच्या पक्क्या विचारांतून ज्या मुलाने आपलं स्व-तंत्र विकसित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज! काय ते पुन्हा जन्म घेऊ शकतील? हा प्रश्न प्रत्येक होणाºया आईनेसुद्धा स्वत:ला विचारला पाहिजे. तशा आईची आज राष्ट्राला गरज आहे की जिच्यापोटी प्रखर सत्यवादी मूल जन्मास येऊ शकेल.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक