शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

मन सर्वात मोठा गुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 2:07 PM

आपला सर्वात मोठा गुरू बाहेरील क्षेत्रातील दुसरा कुणी नसून आपल्याच शरीरात वास करणारे मन आहे

गुरू म्हणजे आध्यात्मिक, पारमार्थिक वाटेवरचाच असला पाहीजे असे अजिबात नाही. समजायला लागतं तेव्हापासून आई आपला प्रथम गुरू, नंतर शाळेतील शिक्षक आणि कालांतराने पुढे अनेक क्षेत्रातील मान्यवर आणि गुरूजंनांकडून आपण ज्ञान अर्जित करीत असतो. जीवनात संगीत, कला, क्रिडा, वैद्यकीय असो की व्यावसायिक क्षेत्रात गुरू हवाच. अपवादात्मक काही जण एकलव्यासारखे दुरून स्वकष्टावर विद्या आत्मसात करणारेही असतील. मात्र, तुम्ही कधी विचार केला का? आपला सर्वात मोठा गुरू कोण?आपला सर्वात मोठा गुरू बाहेरील क्षेत्रातील दुसरा कुणी नसून आपल्याच शरीरात वास करणारे मन आहे. होय आपलं मन..आपलं मन! जसं सांगेल तसंच आपण वागत असतो.  कुठलाही निर्णय घेताना आधी मनाचाच कौल घेतो. मन सांगेल तसेच वागत असतो. म्हणजेच मन हे शक्तीस्वरूप आहे, याचीच जाणीव प्रत्येकाला होते. म्हणूनच मनाची शक्ती योग्य मार्गाला लावा. मनाची शक्ती योग्य मार्गाला वाली, आपल्या मनाला नियंत्रित करून आदर्श वागायला शिकविलं. तरच आपण गुणसंपन्न सत्शील असे होऊ शकतो!मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण साधण्यासाठी मनाला योग्य वळण लावावेच लागेल. मनाला योग्य वळण लावण्यासाठी क्रोध, अहंकार सोडला पाहीजे. संज्जनांची संगत आणि वाणी गोड ठेवली पाहीजे.समाजात बुध्दीमान माणसे खूप आहेत. पण आपल्या जाणतेपणाचा अहंकार नसलेली निगर्वी मनाची माणसे त्यात किती सापडतील, हा एक गहन प्रश्न आहे.सदवस्तूचे ज्ञान घेताना त्या ज्ञानाचा अहंकार झाला तर ते ज्ञान आत्मसात होत नाही. ‘मी’ माझे म्हणणारे अहंकारी मन कुणाला आपलेसे करून त्याच्याशी समरस होऊ शकत नाही. ‘मनात एक  आणि ओठात एक’ या वृत्तीने मनुष्याचा ºहासच होतो. ‘क्रियेवीण नानापरी बोलीजे ते परी चीत दुश्चित ते लाजवीते’ याप्रमाणे माणूस खूप आदर्श वागण्याच्या बढाया मारतो, पण त्याप्रमाणे त्याचे आचरण नसते आणि जगाश्ी कितीही खोटे बोलले तरी स्वत:चे मनच त्याला आतून लाजवीत असते. म्हणूनच मनुष्याने मनाला शिस्त लावीत शुध्द आचरण ठेवावे.माणसाच्या षड्रिपूपैकी सगळ्यात जास्त नुकसान करणारा विकार कोणता? तर तो क्रोध आहे. क्रोध कधीच एकटा येत नाही. तर संताप, मनस्ताप, द्वेष, निंदा या त्याच्या सगळ्या भावांना एकत्र घेऊन येतो. हे सारे येऊन गेलेत की त्यानंतर उरतो तो पश्चाताप! राग आवरायला, मन शांत, समाधानी ठेवायला काय हवे तर फक्त संतांची संगती असावी.मना कोप आरोपणा ते नसावी,मना बुधि हे सांधुसंगी वसावी!मनानी कसं असावं, तर दयाळू, कृपाळू, मवाळू, स्नेहाळू असावं.मनाला गुरूच नव्हे तर महागुरू केल्यास आपल्या जीवनाची नौका कुठेही भरकटणार नाही.

- शून्यानंद संस्कारभारती

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक