शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
2
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
3
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
4
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
6
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
7
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
8
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
9
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
10
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
11
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
12
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
13
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
14
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचे भारताला किती चटके?
15
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
16
छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी
17
छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार
18
मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी
19
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
20
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

अवघा तो शकुन... हृदयी देवाचे चिंतन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 18:59 IST

जेथे हरिचिंतन अखंड आहे तेथे अखंड हरिनिवास आहे व जेथे अखंड  हरिनिवास आहे तेथे अखंड मंगलाचा निवास आहे.

      शुभ शकुन व अपशकुन.  शकुन म्हणजे शुभाशुभाची चिन्हे ज्याला आज तरी तेवढे मानले जात नाही. पण कधीकाळी त्याचा प्रचंड पगडा मानवी मनावर  होता.  मांजर आडवी जाणे हा मोठा अपशकुन मानला जायचा व त्याला आजही काही लोक मानतात असे बरेचदा दिसून येते. सुमारे सातशे वर्षापूर्वी सहदेव भाडळी या बहिणभावांनी केलेले शकुन शास्त्र मागील शतकापर्यंत सर्वश्रृत होते. यात काव्यमय संकेत असायचे जसे,       एका नाके बहु शिंका । सहदेव म्हणे शकुन निका ॥ म्हणजे एकाच नाकपुडीतून खूप शिंका आल्या तर तो चांगला शकुन आहे असे समजावे              शकुन दोन प्रकारचे मानले जातात. एक आंतरिक शकुन व दुसरा बाह्य शकुन. आंतरिक शकुनाचा संबंध व्यक्तिच्या शारीरिक क्रियांशी जोडला जायचा. जसे डोळा फडफडणे, विशेषता डाव्या डोळ्याचे फडफडणे, तळहात खाजवणे, बाहु स्फुरण होणे इत्यादिचा आंतरिक शकुनात समावेश होतो. दुसरा बाह्य शकुन. याचेही दोन प्रकारचे मानले जातात. एक म्हणजे पशु पक्षी आदि जीवांचे क्रियाकलापावर आधारित तर दुसरे अंतरिक्षी शकुन. ज्यामध्ये चंद्र, नक्षत्रे, ग्रह, धुमकेतु, उल्कापात दर्शन आदि यावरुन भविष्यातील शुभ अशुभ घटनांचे संकेत सांगितले जायचे.                अशा प्रकारे जीवनात काही चांगलेच व्हावे या अपेक्षेपायी माणसाचे मनात शुभाशुभाचे चिंतन सुरु असते. शुभाशुभ शकुनाला मानणारी माणसं एकप्रकारे काेणत्याही कार्यात काही वाईट होऊ नये, अमंगल होऊ नये म्हणून मंगल मुहूर्त पहायची. शकुनाला लक्षात घ्यायची. आज मुहूर्त केवळ लग्नपत्रिकेवर लिहिण्यापुरता आहे. पालन करण्यासाठी नाही.  एक काळ होता शकुनाची वा सुमुहूर्ताची माणूस काळजी घेत होता , तेथे आता निष्काळजी झाला आहे. परंतु शकुनाबद्दल संत काळजी घेत नाहीत वा निष्काळजीही होत नाहीत. 

         अवघा तो शकुन । हृदयी देवाचे चिंतन ॥          येथे नसता वियोग । लाभा उणे काय मग ॥       अवघा शकुन.  तुकोबाराय म्हणतात, चांगला असो का वाईट आमचे साठी अवघा शकुन सारखाच आहे. कारण संसार आहे तर चांगल्या वाईट शकुनावर चिंतन होते.  पण चिंतन हृदयात देवाचे सुरु झाले. मग चांगल्या शकुनाचे कर्मधैर्य वा वाईट शकुनाची मनी भीती, हे काहीच राहिले नाही. कारण  जेथे हरिचिंतन अखंड आहे तेथे अखंड हरिनिवास आहे व जेथे अखंड  हरिनिवास आहे तेथे अखंड मंगलाचा निवास आहे. अखंड निवास आहे मंगलाचा तर मंगलाचा वियोग नाही. मग अलभ्य असे काय राहिले. ज्याला विश्वाचे परम मांगल्य मिळाले त्याला अलभ्य काय राहिले. त्यामुळे लाभ हानी, शुभ अशुभ, मंगल अमंगल ह्या सांसारिक व्दंव्दातून तुकोबाराय मुक्त झाले. ठेवीले अनंते तैसेचि राहावे हा बोधपूर्ण निर्धार होऊन तुकोबांचे जगणे सुरु झाले, त्याचक्षणी  अपशकुनाचे भय संपले व शुभशकुनाची आस्था संपली.              हृदयी देवाचे चिंतन आहे व देवाचा वियोग नाही तर तेा कशामुळे ? तुकोबाराय म्हणतात

.    छंद हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥   तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ अवघ्या दिशा ॥

देवाचा वियोग नाही याला कारण तुकोबांना अखंड हरिनामाचा लागलेला छंद. लोक संसाराचे छंदी होतात. दारुचे छंदी होतात, खाण्याचे, पिण्याचे, जगण्याचे छंदी होतात. संतांना हरिनामाचा छंद लागतो. अखंड हरिनामाने वाचा सदैव शुध्द होते. तुकोबा म्हणतात, हरिभक्ताला, हरिदासाला सर्वत्र, सर्व दिशांना सर्वकाळ शुभकाळ आहे. दिशेचेही नांव तुकोबा यामुळे घेतात की, शकुन दिशांचे बाबतीतही पाळला जातो.  पण आता तुकोबांसाठी सर्व दिशा शुभ झाल्या, सर्व दिशांना शुभकाळ आहे.

सुफला एकादशीचे पावन पर्वावरसंतश्रेष्ठ तुकोबारायांना श्रध्दा नमन !                                           

 शंना.बेंडे पाटील

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक