शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धतेतून भक्त व भगवंताचे मीलन - ब्रह्मेशानंद स्वामी महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:13 IST

बाह्य शुद्धता करता करता आंतरिक शुध्दता राखता आली पाहिजे. देहामध्ये वास करणारा भगवंत शुध्दतेमुळे आहे. यासाठी तन, मन,

आपल्या कार्याला शिस्त नसेल तर देव त्यास जवळ घेत नाही. मग ते देवाचे भजन-कीर्तन असो, जप तप असो. हे कार्य करणारा स्वतः शुद्ध राहिला पाहिजे. जेथे शुद्धता असते तेथे देव वास करतो. आपण शुद्धच राहिलो नाही तर देव आपल्यापासून दूरच राहणार. भक्तांनी शुद्धतेत रहायला शिकले पाहिजे. शरीर शुद्ध राखले पाहिजे. शरीराची शुद्धता, वातावरणाची शुद्धता, इंद्रियांची शुद्धता, येनकेन प्रकारे ज्या ज्या माध्यमांतून आपला शुद्धतेचा संबंध येतो, त्या सर्वांकडे आपण शुद्धतेचा संदेश पोचवला पाहिजे.  शुद्धतेमध्ये भगवंत विराजमान असतो म्हणून त्याला स्वच्छता आवडते.

 

बाह्य शुद्धता करता करता आंतरिक शुध्दता राखता आली पाहिजे. देहामध्ये वास करणारा भगवंत शुध्दतेमुळे आहे. यासाठी तन, मन, स्वच्छ केले पाहिजे. आपले बोलणे, ऐकणे सुध्दा शुध्द असले पाहिजे. साहजिकच यामुळे समाजात सज्जनांची वस्ती वाढेल.आज भ्रष्टाचार फोफावला आहे,अशुध्दता प्रचंड वाढली आहे. म्हणून आपल्या मनाला सात्त्विकतेचा संदेश आपणच दिला पाहिजे. संत संगतीमध्ये शुध्दता आपणच निर्माण केली पाहिजे. आपल्याला संसारात काम , क्रोध, मोह, मद, मत्सर याही षडरिपुंची गरज आहे. कारण त्या भगवंतानी आपल्याला दिलेल्या आहेत. जी जनावरं दुसऱ्यांना मारून खातात त्यांना पाळू नये. मांस भक्षण केल्याने आपली प्रकृती अशुध्द बनते. दुसऱ्याचे मांस खाऊन जगण्यात काय अर्थ राहणार ?

 

सात्विकता हृदयात ठेवली पाहिजे म्हणून आहार शुध्द असावा. मुखाला शुध्द राखले पाहिजे. कारण मुखातून निघालेला एक शब्द जरी विषारी असला तर तो कितीतरी लोकांची मने कलुषित करून टाकतो. एवढी जबरदस्त ताकद एका शब्दामध्ये असते. या वाणीतून चांगलीही कामे होऊ शकतात. पण जे लबाडीकरिता आपली वाणी खर्च करतात, त्यांना भगवंताकडून क्षमा नाही. लबाडीचे शब्द पूजनीय नाहीत .एक शब्द वाकडा पडला तर त्याची गंभीर किंमत चुकवावी लागते.आपल्या वाणीतून स्वहिताचे शब्द ,चांगले शब्द आले पाहिजेत. त्यामुळे आपले कल्याण होते.

 

आपले जीवनव्रत ही भगवंत सेवा आहे. येथे भगवंत नित्य प्राप्त आहे. येथे भगवंत आहे तोच मिळतो, त्याला कोणत्याही प्रांतातून हुडकून आणण्याचा वृथा प्रयत्न करावा लागत नाही. याचे कारण कोणत्याही वासनेच्या तथा कामनेच्या पूर्ततेसाठी त्याचा संबंध आम्ही मानलेला नाही. उलट तोच एकंदर कर्तव्य-कर्माच्या ठिकाणी सदा प्राप्त राहतो आहे. तर आणखीन त्याच्याकडे काय मागायचे बाकी आहे. भगवंत भक्त आहे तो द्वितीय जाणत नाही .' देव ,भक्त -दुजा ना विचार ' म्हणूनच भक्ताला तो नित्य प्राप्त राहतो. यामुळेच त्यास भक्त ही संज्ञा प्राप्त आहे. असा जो भक्त ज्या ठिकाणी वास करतो, तेच भगवंत मिळण्याचे स्थान आहे.

 

जो व्रती आहे त्याला भगवंताचा भागवत धर्म पाळावाच लागतो. अन्य उपचारांना तिलांजली देऊन जो शुध्द झालेला असतो तोच व्रताचरण होय. भगवंतावाचून अन्य कोणाचीही सत्ता भक्ताला मान्य राहत नाही. जडचेतन रूपाने केवळ त्याचाच संस्पर्श जो प्राप्त राहत आहे त्या अविनाशिकाचा परिचय देणे हेच एकमात्र कर्तव्य त्यास मान्य राहत आहे. उभय रूपात अभिन्न एकत्वाने सम-समान राहणे ज्या परम तत्वाचे सदा आपल्या भावाचे अनुरूप प्राप्त राहणे आहे. त्याच्याशी नित्य - संबधित तथा नित्य -युक्त राहण्याचे लक्षण प्रगटही राहत आहे. भक्त व भगवंताचे मीलन होय.

शब्द-संकलन : किशोर स. नाईक, डोंगरी गोवा  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक