शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

गुरु अन प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 2:54 PM

हल्ली जगात गुरुचे नुसते पेव फुटले आहे कुठेही पहा देशाचे, वेशाचे वेगवेगळे गुरु सर्वत्र दिसतात. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘भगवें तरी श्वान सहज वेश त्याचा 

अहमदनगर: हल्ली जगात गुरुचे नुसते पेव फुटले आहे कुठेही पहा देशाचे, वेशाचे वेगवेगळे गुरु सर्वत्र दिसतात. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘भगवें तरी श्वान सहज वेश त्याचा । तेथे अनुभवाचे काय काज’ असे काही पोटभरू गुरु आहेत. त्यांच्याकडून साधकाचा उद्धार होऊ शकत नाही. गुरुशिष्य परंपरा हा एक भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. कोणत्याही क्षेत्रात गुरुशिवाय तरणोपाय नसतो कारण एखाद्या वस्तूचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर अगोदर त्या वस्तूविषयी असलेले अज्ञान घालवावे लागेल व ते अज्ञान आपल्या स्वत:च्या प्रयत्नाने जात नाही. त्याला गुरूची आवशकता असते. अगदी नेहमीच्या परिचयातील उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला कार चालवायची असेल तर ती कार शिकावी लागेल, त्यासाठी जो त्यातील तज्ञ आहे. त्याच्याकडे जावे लागेल आणि मग तो आपल्याला ड्रायव्हिंगमधील खाचा खोचा शिकवतो व त्याच्या नजरेखाली बरेच दिवस कार चालवावी लागते मगच आपण योग्य रीतीने कार चालवू शकतो तसेच आहे. कोणतेही ज्ञान गुरुशिवाय प्राप्त होत नाही. गुरु अविद्येचे हरण करतो व हृदयग्रंथीचे छेदन करतो.अविद्या ह्रदयग्रंथिबन्धमोक्षो यतो भवेत ।तमेव गुरुरित्याहुगुर्रुशब्देन योगिन: ॥गुशब्दस्त्वन्धकार: स्यात रुशब्दस्तन्निरोधक:े अन्धकारनिरोधित्वात गुरुरित्यभिधीयते े‘गुरुगीता’ ‘गुकार’ म्हणजे अंधकार आणि रूकार म्हणजे घालविणे किंवा सूर्य जो अंधकाराचा नाश करतो. गुरू म्हणजे अंधकार घालविणारा. अज्ञान म्हणजेच अधंकर व ज्ञान म्हणजे प्रकाश. शास्त्रामध्ये अनुयोगी आणि प्रतियोगी असा एक प्रकार सांगितला आहे. समजा अज्ञान हे अनुयोगी आहे तर ज्ञान हे प्रतियोगी आहे. प्रतियोगी आल्यानंतर अनुयोगी रहात नसतो. सूर्य उगवल्यावर अंधकार राहत नाही. कारण अंधकाराचा प्रतियोगी प्रकाश असतो. जीवाला स्वस्वरूपाचे अज्ञान असते व ते अज्ञान कशानेही जात नाही. ते फक्त स्वस्वरूपाचे ज्ञानानेच जाते. कारण नियम असा आहे कि ज्याचे अज्ञान आहे ते त्याच्याच ज्ञानाने जाते. इतर कशानेही जात नाही व हे ज्ञान केवळ श्रीगुरूच देऊ शकतात इतराला देता येत नाही. कारणतद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:ज्ञानिन: व तत्वदर्शिन: हे दोन पदे महत्वाचे आहेत जो स्वत: ज्ञानी आहे. आणि ते ज्ञान देण्याकरिता समर्थ आहे. अशा योग्यतेचा गुरुच ते ज्ञान देऊ शकतो. गुरुवर शिष्याची श्रद्धा, विश्वास व सेवाभाव असावा लागतो. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय:। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम अचिरेणाऽऽधिगच्छति॥ असे भगवतगीतेमध्ये सुद्धा सांगितले आहे. गुरुचे अनेक प्रकार असतात ते साधारणपणे पुढीलप्रमाणे आहेत.कूर्मपुराणांत दहा प्रकारच्या गुरूंचें वर्णन आहे. उपाध्याय: पिता माता जेष्टो भ्राता महीपति: । मातुल: श्वशुरश्चैव मातामह ...पितामहौ ॥ वर्णज्येष्ठ: पितृव्यश्च सर्वे ते गुरव: स्मृता: उपेत्य अधीयते म्हणजे अध्ययन करवितो तो उपाध्याय होय. असे हे दहा प्रकारचे गुरु आहेत. एकदेशं तु वेदस्य वेदाङ्गान्यपि वा पुन: योऽध्यापयति वृत्यर्थं उपाध्याय: स उच्यते’ आपल्या जीविकावृत्तीकरितां वेद आणि वेदाङ्रे पढून दुस-यासही पढवितो तो उपाध्याय गुरु होय व उपनिषदांसह सर्व वेदादिकांचा जो पाठ देतो तो आचार्य होय .उपाध्यायान्ी दशाचार्या आचायार्णां शतं पिता पितुर्दशगुणं माता गौरवेणातिरिच्यत, उपाध्यायापेक्षां दसपट आचार्य व आचायार्पेक्षां पिता शतपट व पित्यापेक्षां दसपट माता श्रेष्ठ गुरु आहे. तथापि आपस्तंब धर्मसूत्रांत शरीरमेव मातापितरौ जनयतां । आचार्यस्तु सर्वं पुरुषार्थक्षमं रूपं जनयति ॥ मातापिता शरीरच देतात ; परंतु आचार्य पुरुषार्थ -साधन -सामग्री तयार करितो, म्हणून तो वरिष्ठ होय. आचार्य: श्रेष्टो गुरूणां. आणखीही काही ठिकाणी १२ प्रकारचे गुरु सांगितले आहेत.१) धातुवार्दीगुरु - शिष्याकडून तीर्थाटन करवून नाना साधनें सांगून शेवटीं ज्ञानप्राप्ति करून देतो.२) चंदनगुरु - चंदनवृक्ष जसा आपल्या जवळच्या वृक्षांना आपल्यासारखाच चंदन बनवितो. ( पण हिंगणवेळू व केळी यांच्यावर काही परिणाम होत नाही ) तसा अभाक्ताशिवाय आपल्या केवल संगीतीनेच हा गुरु शिष्याचा उद्धार करतो.३) विचारगुरु- नित्य-अनित्य विचार व आत्म- अनात्म विचार शिष्याला देतो. माऊली सांगतात कि, गुरु दाविलिया वाटा, येवोनिया विवेक तीर्थ तटा, धुवोनिया मळकटा बुद्धीचा तेण.४) अनुग्रहगुरु- साधकाला अनुग्रह देतो व त्याच्या क्रुपेनच शिष्यास सहज आत्मज्ञान होते. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे, किंवा ओम नमोजी ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, नाथ बाबा.५) परीसगुरु - परीस ज्याप्रमाणें स्प्रर्शमात्रेंकरून लोहाचे सोने करतो तसेच तो स्पशार्नें शिष्यास गुरुत्व पदावर नेतो. आपणासारिखे करिती तत्काळ ‘नाही काळ वेळ तयालागी’६) कच्छपगुरु किंवा कूर्म गुरु - कच्छ, कूर्म म्हणजे कासवी ज्याप्रमाणें नुसत्या अवलोकनानें पिलांचें पोषण करिते. तसेच हा कृपा कटाक्षे न्याहाळले. आपल्या पदी बैसविले. बाप रखुमादेवीवरु विठ्ठले ‘भक्ता दिधले वरदान’७)चंद्रगुरु - चंद्रोदय झाल्यावर चंद्रकांत मणी पाझरू लागतो तसेच त्या गुरुचे अंतर द्रवतांच जवळचे व दुरचेही शिष्य उद्धरून जातात.८) दर्पणगुरु- आरशांत पाहिल्याबरोबर आपलें मुख आपणांस दिसते. त्याप्रमाणे श्रीगुरुचे फक्त दर्शन झाल्याबरोबर स्वरूपज्ञान होते.९) छायानिधिगुरु - छायानिधि या नावाचा एक मोठा पक्षी आकाशांत फिरत असतो. त्याची छाया ज्याच्यावर पडते तो राजा होतो. त्याप्रमाणे ह्या गुरूची छाया ज्याच्यावर पडते तो तत्काळ स्वरुपकार आनंदाधीपती होतो१०) नादनिधिगुरु- नादनिधि नावाचा मणि आहे. ज्या धातूचा ध्वनि त्याच्यावर पडतो ते सर्व धातू स्वस्थानीच सुवर्ण बनतात. त्याप्रमाणे मुमुक्षूची करुणवाणी त्याच्या कानी पडताच मुमुक्षूस दिव्य ज्ञान होते.११) क्रौंचपक्षीगुरु- क्रौंच नांवाची पक्षीण समुद्रतीरीं पिलें ठेवून चारा आणण्यासाठी बरेच दिवस दूरवर जाते तिला यावयास काही महिने लागतात व वारंवार आकाशाकडे डोळे लावून पिलांची आठवण करते. त्यामुळे तेथेच पिले पुष्ट होतात. त्याचप्रमाणे हा गुरु ज्याचे स्मरण करतो ते आपापल्या स्थानीच उद्धरून जातात.१२) सूर्यकांतगुरु- सूर्यदर्शनानें सूर्यकांत मण्यात अथवा भिंगात(बहिर्गोल भिंग ) अग्नी पडतो व खालीं घरलेला कापूस जळून जातो. ( सूर्याची इच्छा नसतांनाही) त्याप्रमाणे ह्या गुरूची द्दष्टि जिकडे झळकते ते पुरुष तात्काळ स्वरूपस्थितीस प्राप्त होतात. रुद्रयामलांत सांगितलें आहे की, ग्रंथवाचनानेंच, जपतपादि साधने केली तरी त्याचा विशेष उपयोग होणार नाही. अधिकारी गुरूशिवाय आत्मज्ञान होणार नाही. गुरुतंत्रांत सांगितले आहे की, शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन । तस्मात शुद्धमना नित्यं तमेवाराधयेत? गुरु. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, म्हणोनी जाणतेनी गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. या ओवीप्रमाणे सर्व परमार्थ एका गुरुभजनात सफल होतो. पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्या श्रीगुरुवर आपला गुरुभाव असणे महत्वाचे आहे.भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी.भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीलेगुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी (पा) ता. नगरमोबा. ९४२२२२०६०३ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर