शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

कोदंडधारी राम सदैव स्मरणात राहू द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 04:52 IST

जेव्हा धर्म साकडला होता, संकटात होता, तेव्हा श्रीराम आपल्या धनुष्यासी एकरूप झाले.

- शैलजा शेवडेपरित्राणाय साधुनां, विनाशाय च दुष्कृतां.धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे..श्रीराम विष्णूचा अवतार आहे. भगवद्गीतेत, आपल्या विभूती सांगतांना श्रीकृष्ण म्हणतात, राम: शस्त्रभृतामहं. शस्त्रधाऱ्यांमध्ये मी राम आहे. त्याबद्दल ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरीत म्हणतात,शस्त्रधरां समस्तां माजीं । श्रीराम तो मी ॥ जेणें साकडलिया (संकटात सापडलेल्या) धर्माचे कैवारें (पक्ष)। आपणपयां (स्वत:ला) धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये एक मोहरें (एकमार्गीं) । केलें त्रेतीं (त्रेतायुगांत) ॥ पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं (योग्य वेळी) । प्रतापलंकेश्वराची सिसाळीं (मस्तकपंक्ती) । गगनीं उदो म्हणतया हस्तबळी । दिधली भूतां (आकाशांत उदो उदो म्हणणाºया भूतांच्या हातांवर बळी म्हणून टाकली) ॥ जेणे देवांचा मानु गिंविसला । धर्मासि जीर्णोद्धार केला । सूर्यवंशीं उदेला (उगवलेला) । सूर्य जो कां ॥ तो हतियेरूप रजतिया आंतु। रामचंद्र मी जानकीकांतु ।अहाहा किती सुंदर वर्णन! धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा धर्म साकडला होता, संकटात होता, तेव्हा श्रीराम आपल्या धनुष्यासी एकरूप झाले. स्वत:च जणू धनुष्य बनले. नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्यांची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाच्चे, त्यांच्या हातात बळी म्हणून दिली. रामचंद्राने देवांचा मान, देवांची कीर्ती परत मिळवून दिली आणि धर्माचा पुनरुद्धार केला. सूर्यवंशात तो प्रतिसूर्यच उदयास आला, तो जानकीनाथ राम माझी विभूती आहे.तो कोदंडधारी राम सदैव स्मरणात राहू द्या.दिनानाथ हा राम कोदंडधारी,पुढे देखता काळ पोटी थरारी ।जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी,नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक