प्रभू : दया, क्षमा, मातृभावनेची मूर्ती ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:29 PM2020-08-21T12:29:47+5:302020-08-21T12:30:32+5:30

पर्युषण पर्व विशेष...महावीर वाणी...

Lord: The idol of mercy, forgiveness, motherhood ...! | प्रभू : दया, क्षमा, मातृभावनेची मूर्ती ...!

प्रभू : दया, क्षमा, मातृभावनेची मूर्ती ...!

Next

वयाच्या ३० व्या वर्षी प्रभूंनी दीक्षा अंगीकारली़ वीरप्रभूंनी मातेच्या गर्भात असताना एक प्रतिज्ञा पूर्ण केली़ पिता सिद्धार्थ महाराज, माता त्रिशला महाराणी, काका सुपार्श्व, भाऊ नंदीवर्धन, बहीण सुदर्शना, पत्नी यशोदा, पुत्री प्रियदर्शना, जावई जमाली आणि मामा चेडाराजा असा त्यांचा परिवार होता.

दीक्षा घेतल्यानंतर प्रभू गावोगावी पायी फिरले़ त्याकाळी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा उपयोग केला नाही़ तसेच त्यांनी स्वत:साठी कोणाकडून काही मागितले नाही.

यादरम्यान अनेक असुरांनी त्यांना त्रास दिला़ त्यांनी त्याचा प्रतिकारही केला नाही़ उलट त्यांनी समोरील उपद्रवाला विरोध केला नाही़ मनात त्याच्याप्रति दया, क्षमा, मातृभाव,  समता, करुणाप्रधान, वात्सल्यमूर्ती जपली़ ते स्त्रियांचे उद्धारक ठरले.

दीक्षा घेतल्यानंतर साडेबारा वर्षांनी त्यांना चौथे ज्ञान, मनपर्यवज्ञान आणि पाचवे केवलज्ञान प्राप्त झाले़ या दरम्यान त्यांनी कोणालाही उपदेश केला नाही़ मग इंद्रदेवाने त्यांच्यासाठी सिंहासनासारख्या (समवसरण) स्टेजची व्यवस्था केली़ त्या तिन्ही बाजूने समवसरणात महावीरांची प्रतीकृती निर्माण केली़ चौथ्या भागात प्रभूंना प्रभूच उपदेश देण्यास सुरुवात केली़ त्यांचा धर्मसभेत देव-दानव, सुर-असुर, पशू-पक्षी तसेच हिंस्र प्राणीदेखील येऊन त्यांचा उपदेश ऐकायचे़  स्वत: ३४९   दिवसच आहार घेतला़ ४३५१    दिवस विविध प्रकारचे तप केले़ कोणत्याही स्थितीत झोप न घेता हे कार्य केले.
- रतनचंद जैन
- पिंकी कवाड 

Web Title: Lord: The idol of mercy, forgiveness, motherhood ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.