शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

देहात राहूनही देहातीत..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 7:54 PM

परमेश्वर प्राप्तीसाठी नामसाधना करीत असतांना साधक त्या साधनेत इतका तद्रुप व्हावा की त्याला देहाचा विसर पडावा.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) 

परमेश्वर प्राप्तीसाठी नामसाधना करीत असतांना साधक त्या साधनेत इतका तद्रुप व्हावा की त्याला देहाचा विसर पडावा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात -ते वर्तत दिसती देही । परी ते देही ना माझ्या ठायी ॥आणि मी तयाच्या ह्रदयी । समग्र असे ॥अर्जुना..! असा साधक देहात असला तरी देहापासून अलिप्त असतो. देहाबद्दल त्याला तादात्म्य नसते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -असो ऐसा कोठे आठवची नाही । देहिच विदेही भोगू दशा ॥ साधकाने प्रपंचात कसे राहावे..? याचे वर्णन संत करतात. काही उदाहरणांनी हा विषय आपण स्पष्ट करु यात.

समजा एखाद्या गावातील धर्मशाळेत एखादा प्रवासी आला. रात्रभर तो त्या धर्मशाळेत मुक्कामी राहिला तर तो असा कधी विचार करतो का की ही धर्मशाळा बांधावयास किती खर्च आला असेल? कोणत्या कंपनीचे सिमेंट वापरले असेल? या गोष्टींशी त्याला घेणे देणे नाही कारण त्याला हे नक्की माहीत आहे की, मी फक्त एकच दिवस इथे राहणार आहे. नाथबाबा वर्णन करतात -वस्तीकर वस्ती आला । प्रात:काळी उठून गेला ॥तो जितक्या उदासीनपणे त्या घटनेकडे बघतो, तितक्याच उदासीनपणे साधकाने देहाकडे बघावे तरच देहीचं विदेहीदशा प्राप्त होते. जसे चित्रपटातील सगळ्या घटना पडद्यावरच घडत असतात पण पडद्याचा त्या घटनांशी संबंध नसतो. तसेच देहासंबंधात घडणाऱ्या घटनांशी आत्म्याचा संबंध नसतो. परमेश्वर प्राप्तीसाठी साधना करणाऱ्या साधकाला हे ज्ञान झालेले असते म्हणून तो देहाविषयी उदास होतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात -तरी जो या देहावरी । उदासु ऐसी या परी ॥उखिता जैसा बिढारी । बैसविला आहे ॥साधकाला साधना करतांना या अवस्थेपर्यंत जाता आले पाहिजे. तो देह भावातच अडकून बसला तर देहात असणारा परमात्मा कसा प्राप्त होईल...?

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक