शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

 मानवी जीवनाचा दीपस्तंभ : भगवद्गीता ग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 18:16 IST

जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय.

भारतीय ग्रंथ सारस्वतामध्ये सर्वांचा मुकूटमणी म्हणून कोणता ग्रंथ असेल तर भगवद् गीता होय. प्राचीन  भरतवर्षातील या ग्रंथाने मानवी जीवन कसे जगावे याचा आदर्श वस्तुपाठच विशद केला आहे. अर्जुन या ग्रंथाचा नायक असून भगवान श्रीकृष्ण या ग्रंथाचे महानायक आहेत.  आपल्या प्राणसख्या असणा-या अर्जुनाला ते त्याच्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय. मानवी जीवनसुद्धा एक युद्धभूमी असून प्रत्येकाला आपले जीवनप्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एका आदर्श मार्गदर्शकाची आवश्यकता असते. ख-या ज्ञानाची गरज भासते. मानवी जीवन  हे जेंव्हा काय करावे? व काय करू नये? अशा द्वंवद्ववामध्ये सापडते तेव्हा कोणता विचार अंगिकारावा हा प्रश्न पडतो. त्यावेळी एकच भगवद्गीता विचार आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधुन देऊ शकतो. मानवी जीवनात उत्पन्न होणा-या अनेक परस्थितीतींची व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून प्राप्त होतात. म्हणून प्रत्येकाने हा गीता विचार अंगीरावा. मानवाला जेव्हा आपले शरीर आणि मन यांच्या माध्यमातून अनेक दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा त्याने भविष्यकाराला आपला हात दाखविण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांना शरण जावून भगवद्गीतेतील परमेश्वरासोबत असलेल्या आपल्या वास्तविक संबंधाना समजून घेण्याची खरी वेळ जीवनात आलेली असते.  

भगवगद्गीता ही सर्वांची माउली असून, सर्वांना आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय? ते प्राप्त करण्यासाठी तू कोणते कर्म करीत आहेस ?  असा प्रश्न विचारीत असते  व त्या सर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी सदोदीत मार्ग दाखवित असते. गीतेचा कर्मसिद्धांत हा मानवी जीवनाला मिळालेला अमृतकुंभच होय.  त्या एका सिंद्धाताचे पालन जरी प्रत्येकाने केले तर आज मानवी जीवनातील असंख्य समस्यांना निश्चितच उत्तर सापडेल. भगवान श्रीकृष्णांनी  अर्जुनाला सुद्धा तोच महत्त्वाचा विचार सांगितला होता. तू तुझे नियत कर्म कर; परिस्थीती कोणतीही असो.  

यत्र योगेश्वर कृष्ण: यंत्र पार्थ धनुर्धर:।

तत्र श्रीविजयो भूतिरध्रुवा नितीर्ममतीम।।

 अर्जुनाने जेव्हा युद्धामध्ये  माझ्या समोर  माझे  काका, मामा, गुरू आहेत.  युद्ध कसा करू? असा प्रश्न केला तेव्हा  श्रीकृष्णांनी आपल्या समोर आलेल्या परिस्थितीचा सामना तू कर असे सांगीतले. तुझे कर्मच तुला तुझ्या समस्येचे निराकरण करणारे आहे. 

यत्करोषि यदक्श्र्नासि ददासि यत् ।

यत्पस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व सदर्पणम।। गीता (९/२७ )

स्वतःच्या कर्मानेच मनुष्य हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत असतो. स्वकर्मेच  त्याला विशिष्ट ठिकाणी पोहोचवत असतात. ज्ञानप्राप्तीनंतर जशी कर्माची चिंता उरत नाही, त्याप्रमाणेच जीवनामध्ये कर्मयोगाला जर आत्मज्ञानाची जोड दिली, तर जीवन कृतकृत्य होते.  जेव्हा मनुष्य आपले जीवनाचे मुळ ध्येय विसरतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या मुळ ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घेतात. हा गीतेतील महत्त्वाचा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या पाच तत्वांचे महत्त्वाचे विस्तृत वर्णन आलेले आहे. पहिले चार तत्त्व जरी मानवी जीवन शक्तीच्या बाहेरील असले तरी. मनुष्याने कर्ममार्गाचे आचरण करावे. ईश्वराने दिलेले नियत जीवनमान योग्य कर्म करून  जीवन आनंदीत करण्यासाठी आहे. रडत बसण्यापेक्षा नियत कर्म करा, हा सिद्धांत जर सर्वांनी अंगिकारला तर जीवनातील असंख्य प्रश्नांना उत्तरे आपोआपच सापडतात. हा गीताविचार सर्वांनी समजून घेणे ही काळाची गरज आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन । 

मा कर्मफलेहेतूर्भूर्मा ते संङगोSस्तवकर्मणी  ।। २/४७

हा जीवनकर्मविचार केवळ एक विचार नसून ती आपल्याला भगवान श्रीकृष्णांसारख्या  प्रभूंनी दिलेला जीवनसुखमयतेचा महत्त्वाचा संदेश आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी कर्माची महती आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगीतली आहे. 

एरवी जग हे कर्माधीन । ऐसि याची व्याप्ती गहन । 

परी ते असो आईके चिन्हं प्राप्ताचे गा ।। ( ज्ञाने. ४/९२)

जग  तुम्हाला कधीही लक्षात ठेवत नाही तर तुम्ही केलेल्या कर्मांनाच आठवत असते. मग ते कर्म तुम्हाला चांगले म्हणून ओळखतात किंवा  वाईट म्हणून ओळखतात. त्यासाठी कर्मविचारच गीताई माउलीचा जीवनविचार आहे. असे या श्लोकातून गीताई आपल्याला संदेश देत आहे.

यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।

यज्ञो दानं तपश्चैव पावनानी मनीषिनाम।। ( गीता १८/५)

श्रीमद् भगवद्गीता ग्रंथ आनंदचिद्घन, ऐश्वर्याने परिपूर्ण चराचरा ने वंदन केलेल्या परम पुरुषोत्तम साक्षात भगवान श्रीकृष्णांची दिव्य वाणी आहे . अत्यंत रहस्त्याने भरलेली आहे. परमदयाळू श्रीकृष्णांच्या कृपेने जे पुरुष श्रद्धा आणि प्रेमळ विशुद्ध भक्तीने आपल्या अंतकरण भरून भगवद्गीतेचे मनन करतात तेच या गीतेच्या स्वरूपाचे काही अंशी दर्शन घेऊ शकतात. म्हणून 

स्वकल्याण इच्छिणाऱ्या स्त्री-पुरुषांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनचा आदर्श पुढे ठेवून स्वतः मध्ये अर्जुनासारखे दैवी गुण बाणवून श्रद्धा भक्तिपूर्वक गीतेचे श्रवण मनन अध्ययन करावे आणि भगवंताचा खूप आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.

- डॉ. हरिदास आखरे 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक