शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जिंदगी प्यार का गीत है..इसे हर दिल को गाना पडेगा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 22:09 IST

सुख आलं, तरी समताभाव राखून आनंद घ्या व दुःख आलं तरी समताभाव राखून तटस्थ राहा.

- डॉ. दत्ता कोहिनकर रात्री दहाचा सुमार, झोपायच्या तयारीत असताना रेडियोवर गाणं लागलं - जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पडेगा। जिंदगी गम का सागर भी है, हमके उस पार जाना पडेगा खरोखर जीवन हे सुख-दुःखाचं मिश्रण आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन भावांनी संपत्ती वाटून घेतली. मोठा भाऊ उच्चशिक्षित, तर लहान अडाणी. मोठ्या भावानं लहान भावाची फसवणूक करून किमती वस्तू स्वतःकडे ठेवल्या. काही दिवसांनी लहान भावानं मोठ्या भावाला घरातील छताच्या तुळईला वडिलांनी कापडात काहीतरी बांधून ठेवल्याचं दाखवलं. त्यात किमती हिरा व चांदीची काळी पडलेली अंगठी होती. मोठ्या भावानं हिरा स्वतःकडं ठेवला व चांदीची अंगठी भावाला दिली. मोठा भाऊ प्रचंड श्रीमंत - मोटार, बंगला सर्व काही मुबलक, तरीही नेहमी व्याकूळ असायचा. बायकोबरोबर भांडणं करायचा. अधूनमधून दारू पिऊन मुलांना मारझोड करायचा. झोपेच्या गोळ्या घेऊ लागला. कामावर जाणं बंद झालं. त्याची समाजात अवहेलना होऊ लागली. कारण त्याच्या मनासारखं घडलं, की तो प्रचंड खूष व्हायचा व मनाविरुद्ध घडलं, की नाराज व्हायचा. लहान भाऊ मात्र कमी संपत्ती असूनही सुखाने संसार करत होता. कारण चांदीच्या अंगठीवरचं वडिलांनी कोरलेलं वाक्‍य तो रोज वाचायचा - ह्यये भी बदल जाएगा.ह्ण त्यामुळे तो सुख आलं तरी नाचायचा नाही व दुःख आलं तरी रडायचा नाही. मोठ्या भावाकडं सगळं ऐश्‍वर्य होतं, पण वडिलांचा ह्यये भी बदल जाएगाह्ण हा मंत्र नव्हता. म्हणून गौतम बुद्ध म्हणतात...सुख आये नाचें नही, दुःख आये नही रोय। दोनो में समता रहे - उत्तम मंगल होय। जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य व परिवर्तनशील आहे. गीतेतही सांगितलं आहे. ह्यजो आज तुम्हारा है, वह कल किसी और का होगा। तेव्हा सुख आलं, तरी समताभाव राखून आनंद घ्या व दुःख आलं तरी समताभाव राखून तटस्थ राहा. त्याला साक्षीभावाने पाहा. कारण सर्वच अनित्य आहे. सुखी होण्यासाठी सर्वप्रथम आपण स्वाध्याय केला पाहिजे. मी कोण? माझी ताकद किती? मी काय करू शकतो? माझे ध्येय काय? प्रत्येकाचा स्वतंत्र पिंड असतो. सगळ्याच पालकांना मुलांनी इंजिनिअर, डॉक्‍टर व्हावंसं वाटतं. पण आपला व मुलांचा पिंड पाहूनच ध्येय निवडलं पाहिजे व निवडलेल्या ध्येयाला सकारात्मक विचारांची जोड देऊन ध्येयप्राप्ती केली पाहिजे. सकारात्मक विचार मनाची सबलता वाढवतात. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, ह्यह्यतेहतीस कोटी देवांवर तुमचा विश्‍वास असेल व स्वतःवर विश्‍वास नसेल तर तुम्ही नास्तिक आहात.ह्णह्ण तेव्हा मन सबल व निर्मल करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ १५ मिनिटे शांतपणे ध्यानाला बसा व तटस्थपणे जाणाऱ्या-येणाऱ्या श्‍वासाला जाणत राहा, हाच मनाचा व्यायाम.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक