शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

सागरा सम बनू या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 02:15 IST

आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये त्यांच्या अंगठ्या पाहतो. मनुष्याच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो, ही आश्चर्याचीच गोष्ट नाही का?

- नीता ब्रह्माकुमारीकाही दिवसांपूर्वी मी ओडिशा येथील चिल्का लेकला गेले होते. थोड्या अंतरावर संगमलाही गेले. जेव्हा तिथं बंगालचा उपसागर पाहिला आणि मनात आलं की खरंच मनुष्याला सागरासमान बनायला हवं. तिकडच्या एका मासेमाऱ्यानं आम्हाला मोती, पोवळं, नीलम, पुखराज, पाचू अशी अनेक रत्नं काढून दाखवली. ते दाखवताना त्यांचं महत्त्वही तो सांगत होता. ज्योतिषशास्त्रात या रत्नांचं खूप महत्त्व आहे. आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये त्यांच्या अंगठ्या पाहतो. मनुष्याच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो, ही आश्चर्याचीच गोष्ट नाही का? पृथ्वीतलावर राहणाºया प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आज अनेकानेक अडचणी, समस्या येतात. खरं तर बाहेरच्या परिस्थितीचं रूप जे पण आहे ते आपल्या आंतरिक अवस्थेचं प्रमाण आहे. अंतर्विश्वामध्ये जे चाललं आहे तेच बाह्यविश्वात होत आहे. जसं सागराचं बाह्यरूप पाहिलं तर तो कधीच शांत नसतो. पण त्याच्या तळाशी असीम शांती असते. मनुष्याचं जीवनही तसंच आहे. बाहेरचं रूप नेहमीच नवनवीन परिस्थितीच्या घेरात अडकलेलं दिसतं. पण त्या सर्व समस्यांची उत्तरं आपल्या अंतर्विश्वामध्येच आहेत. समुद्राच्या तळाशी अनेकानेक अमूल्य रत्नं मिळतात, त्याचप्रमाणे मनाच्या तळाशी जाऊन त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणास मिळत जातात. अनेक रहस्यं उलगडली जातात. बंगालच्या उपमहासागराचं विशाल रूप जेव्हा बघत होते, तेव्हा त्याचं ते शुद्ध, स्वच्छ निळं पाणी दूरपर्यंत दिसत होतं. परंतु जेव्हा ते पाणी उफाळून किनाºयाजवळ यायचं तेव्हा त्याचा रंग बदललेला असे. कधी कधी आपलंही असच होतं. खूप वेळा आपण स्वत:ला समजावतो, आज राग करायचा नाही. आज कुणाला दु:ख द्यायचं नाही. पण अशी काही परिस्थिती आपल्यासमोर येते की, आपण चांगलं ठरवलेलं असलं तरी आपल्याकडून परत परत त्याच चुका होतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक