शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

खुल के जिओ.. जिंदगी मिलेगी ना दोबारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 21:16 IST

नाचावेसे वाटले तर नाचा, रडावेसे वाटले तर रडा, हसावेसे वाटले तर बिनधास्त हसा. 

- डॉ. दत्ता कोहिनकरमित्रांनो; अपराधीपणाची भावना मनात ठेवून जगू नका. समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली व शिट्टी दाबूनच ठेवली तर त्याचे काय होईल ? अर्थात स्फोटच. पाण्याला वाहण्याचा मार्ग बंद केला तर ते पाणी आतल्या आत रापून त्याला दुर्गंधी सुटेल . मानवी मनाचे असेच असते. भावनांना वाट मिळाली नाही, विचारांची देवाणघेवाण झाली नाही की मनात विकृती निर्माण होऊन डिप्रेशन येते . म्हणून संवाद हा अत्यंत आवश्यक असतो. तो मनाचा आहार आहे. संवादामुळे मन मोकळे व हलके होते . विचारांच्या देवाणघेवाणीमुळे विचारांना नवा आयाम मिळतो. आपलं मानसिक संतुलन चांगलं राहतं. थोडक्यात कुकरची शिट्टी दाबू नका. योग्य वेळी योग्य प्रकारे बिनधास्त व्यक्त व्हा . संपन्न व्यक्तिमत्वासाठी व निरोगी मनासाठी संवाद आवश्यक असतो .

तुम्ही मनातच गोष्टी दाबून ठेवल्या तर, शरीरावर व मनावर त्याचा दुष्परिणाम होतो.मनात दाबून ठेवलेली उर्जा बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. मग पाय हलविणे, मुठी आवळणे, आळोखे पिळोखे देणे अशा क्रिया आपोआप घडू लागतात. तुम्ही स्वत:चे निरीक्षण करा, तुम्ही खुर्चीवर बसला आहात, पाय आपोआप हलत आहेत, बेडवर पाय आपोआप आपटले जातात . एखाद्याचा खूप राग आला पण तुम्ही तो व्यक्त करू शकला नाहीत. त्या नकारात्मक उर्जेला तुम्ही योग्य रितीने वाट करून दिली नाही तर हळूहळू ती उर्जा शरीरावर व मनावर नकारात्मक परिणाम करते. त्यातून मानसिक व शारीरिक व्याधींना सुरवात होते. आपल्याला कधी कधी भांडावेसे वाटते, मारामारी करावीशी वाटते, शिवीगाळ कराविशी वाटते,यांचे कारण काय? तर आत कोंडलेली उर्जा बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. कधी ओरडावेसे वाटले, मारावेसे वाटले तर उशीवर गुद्दे मारा, नाचावेसे वाटले तर नाचा, रडावेसे वाटले तर रडा, हसावेसे वाटले तर बिनधास्त हसा. मित्रांनो जीवन सुंदर आहे. मनांसारखे आनंदाने, नैतिकतेने प्रेमाने जगा. भावनांचे दमन न करता योग्य नैसर्गिक मार्गाने शमन करा. मोकळे होण्यासाठी तुम्ही स्वमनाला एवढंच सांगा

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना