अजूनही वेळ गेलेली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 07:44 PM2019-11-23T19:44:26+5:302019-11-23T19:45:21+5:30

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा

It's not time yet ... | अजूनही वेळ गेलेली नाही...

अजूनही वेळ गेलेली नाही...

Next

लहान मुलांची गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे..पालक मित्रांनो सावधान !  आज बऱ्याच घरांमध्ये विद्यार्थीदशेतच गुंड , मवाली , व्यसनी , व्याभिचारी , स्वार्थी, जमात वाढत आहे .याला जबाबदार कोण ? ज्या वयात विद्यार्थ्यांना श्यामची आई , साने गुरूजीच्या कथा , राजा शिवछत्रपती , महात्मा फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , सावित्रीच्या लेकी ही पुस्तके वाचावयास द्यायची होती त्याच वयात आपण त्यांना शेकडो चॅनेलचा रिमोट दिला , इंटरनेट कनेक्शन दिले . मुलाला सोबतीची गरज असतानाही दोघेही पती - पत्नी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले. दिवसभर तो इंटरनेटवर व टिव्हीवर काय बघतो हे कोण बघणार ? ज्या वयात आईचा मायेचा हात , मायेची कुस त्याला हवी असते त्याचवयात त्याला स्वतंत्र खोली दिली जाते . त्याच्या ममतेची निघृण हत्या केली जाते . त्याच्या अवास्तव मागण्या प्रेमापोटी पुऱ्या केल्या जातात . पैशाचे बंडल त्यांच्याकडे फेकले जातात . त्याच्या समोर ज्यावेळेस घरात आई - बाबांची प्रचंड भांडणे अक्षरश : मारामाऱ्या होतात . त्यातून ते मूल काय शिकणार ? कधी कधी उतू आलेलं आईबाबांचं प्रेम या मुलांसमोरच वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित होतं त्यावेळेस या मुलांच्या कोवळ्या मनावर आपण काय कोरतोय याची कल्पना पालकांनी करणे ही काळाची गरज आहे . 'आपल्या मुलांसमोर दारू पिणारे पालक , काही पालक तर मुलींना सांगतात अगं गोव्याला सहलीला चालली का ? मग तेथील.. अवश्य घेऊन ये . मुलांनी टिव्ही बघताना दरडावणारा पालक स्वत : च तासनतास टिव्हीसमोर सिगारेटचा धुर सोडत बसलेला आज पहावयास मिळतोय . मुलींना झाशीची राणी , डॉ . आनंदीबाईची चरित्रे देण्याऐवजी तोकडया कपड्यात स्टेजवर मुलीला दाद देणारे पालक  नक्की काय साधणार आहेत ? मुलांचे - मुलीचे मित्र कोण जाणून घेणार ? आईच तोकडे कपडे घालू लागली . तिलाच सारखे मित्रांचे फोन येत असतील तर मग मुलांना संस्कारक्षम आई " भेटणार कधी ? तरूणांच्या आत्महत्या हा आपल्यासमोर गंभीर प्रश्न आहे. पालकमित्रांनो  थांबा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी  विपश्यना ध्यान केंद्रावर दरमहा आनापान ध्यान शिबिर असते.'  वय ९ ते १८ वयोगटाच्या मुलामुलीसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते . ही संपूर्ण शिबिरे पूर्णपणे विनामूल्य असतात . जुन्या साधकांच्या दानावर हे काम चालते . या शिबिरांमुळे मुलांची स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता,एकाग्रता वाढते, भय कमी होते , चंचलता दूर होते , त्यांची शारिरीक , मानसिक व अध्यात्मिक प्रगती साधते .  आपल्या मुलाना ,  नैतिकतेचे धडे देण्यासाठी सबल व सशक्त पिढी घडवण्यासाठी हा राजमार्ग आहे , या संधीचा आपण आपल्या कुटुंबासह लाभ घ्या व सबल भारत घडवा 

Web Title: It's not time yet ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.