शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जे स्वरुपगत आहे ते सुख देते तर आगंतुक आहे ते दु:ख देते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 19:25 IST

पाहुणा कितीही चांगला असला तरी तो किती दिवस घरात राहावा वाटतो ?

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

जगातील यच्चयावत प्राणीमात्राला सुखच आवडते, दु:ख कुणालाही नको असते. संत म्हणतात- मजलागी दु:ख व्हावे । ऐसे कोणी भाविना जीवे ॥ आपल्याला तरी सुख का आवडते..? आणि दु:ख का आवडत नाही..? याचे कारण संत सांगतात, मुळात जीव हा सुखरुपंच आहे म्हणून जीवाची ओढ सुखाकडेच आहे. जे स्वरुपगत असते ते आवडते व जे आगंतुक असते, ते नको वाटते. सुख स्वरुपगत आहे, दु:ख आगंतुक आहे, म्हणून प्रत्येकाची धाव सुखाकडेच आहे. आपल्या मूळच्या स्वरुपाकडेच प्रत्येकाची धाव आहे. दु:ख का जावे वाटते..? तर ते आगंतुक आलेले असते. पाहुणा कितीही चांगला असला तरी तो किती दिवस घरात राहावा वाटतो..? व मुलगा कसाही असला तरी घरातून जावा, असे वाटते का..? कारण काय तर मुलगा हा स्वरुपगत आहे व पाहुणा हा आगंतुक आहे. स्वरु पगत आहे ते राहिलेच पाहिजे व आगंतुक आहे ते गेलेच पाहिजे. याचे कारण स्वरुपगत आहे ते सुख देते व आगंतुक आहे ते दु:ख देते. हा जीव परमेश्वराचा अंश आहे व परमात्माच सुखरु प आहे. संत म्हणतात सुखरुप ऐसा दुजा कोण सांगा ।माझ्या पांडुरंगा सारिखा तो ॥म्हणून जीवाची ओढ सुखाकडेच आहे. दु:ख हे आगंतुक आलेले आहे, ते नको वाटते. वेदांतशास्त्रात एक उदाहरण आलेले आहे. साळू नावाचा एक प्राणी असतो. या प्राण्याच्या अंगावर दाभणाएवढे मोठे काटे असतात. शत्रूपासून वाचण्याकरिता परमेश्वराने केलेली ती व्यवस्था आहे. त्या साळूवर एखाद्याने आक्र मण केले की तो आपले शरीर फुगवतो मग ते अंगावरचे काटे बाणासारखे सुटतात व समोरच्या प्राण्याला इजा करतात. असा हा अंगावर काटे असणारा प्राणी अरण्यात फिरतांना टाचणी एवढा काटा जरी याला रु तला तरी त्याला तो सलत राहतो. टाचणीएवढा काटा शरीरातून जावा वाटतो व दाभणाएवढा काटा शरीरावर राहावा वाटतो कारण काय तर, स्वरु पगत असते ते राहावे वाटते व आगंतुक आलेले जावे वाटते.

एखादा नास्तिक देव मानणार नाही परंतु त्याला सुख हवे वाटते आणि दु:ख नको वाटते. पण सुख पाहिजे म्हणून ते मिळणार नाही आणि दु:ख नको म्हणून टळणार नाही. त्यासाठी कर्म चांगले करावे लागेल. सुख आणि  दु:ख आपल्याच कर्माचा भोग आहे. या जगात जिथे सुखाची प्राप्ती आहे तिथे जीव कधी जात नाही व जिथे दु:ख आहे तिथे गेल्याशिवाय राहात नाही. वाईट कर्माने दु:ख प्राप्त होते. मनुष्य वाईट कर्म केल्याशिवाय राहात नाही व चांगल्या कर्माचे फळ सुख आहे. मनुष्य चांगले कर्म कधी करीत नाही. म्हणून दु:ख कधीही टळत नाही...! 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र. मोबाईल क्र. 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक