शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

उपासनेला दृढ चालवावे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 9:35 AM

सद्गुरूंची उपासना केल्याने प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नष्ट होऊन सर्वांप्रती समबुद्धी भाव विकसित होतो.

- धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

सर्व स्थिरचर सृष्टीचा मूळ स्त्रोत हा आत्मा आहे. मानवमात्राचा सर्वांगीण विकास आत्मोपासनेत दडलेला आहे. आत्मकेंद्रित झालेला माणूस नराचा नारायण होतो. आत्मदेवाचा परिचय पूजनीय सद्गुरू करून देतात. सद्गरूंना शरण जाऊन आत्मज्ञान प्राप्त करून आत्मोन्नती साधावी. सद्गुरूंची उपासना केल्याने प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नष्ट होऊन सर्वांप्रती समबुद्धी भाव विकसित होतो.सर्वश्रेष्ठ उपासनेमुळे मनावर शुद्ध सात्त्विक संस्कार होतो. यामुळे आध्यात्मिक प्रगती, दीर्घायुष्य, आरोग्य व सर्व कामांत यश प्राप्त होऊन संसारात सद्गुरुकृपेचा आनंददायी अनुभव प्राप्त होतो. उपासना ही विद्वत्तेसोबत गेली पाहिजे. जेव्हा त्यासोबत चालता, तेव्हा माणसाचे सर्वत्र रक्षण होते. माणसाने मोठा विद्वान होणे जितके आवश्यक आहे, तितकेच ती विद्वत्ता टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. यातूनच समाज मोठा होतो, ज्ञानी होतो. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असे म्हटले जाते. खरं तर यात पाय धरणे महत्त्वाचे नसते तर तो त्याच्या विद्वत्तेला सलाम असतो. जो विद्वान असतो, त्या विद्वानांनी आपले आचरण चांगले राखले पाहिजे. हे आचरण विद्वत्तेला परिपूर्ण असले पाहिजे.संसारामध्ये असलेल्या लोकांना भक्ती सांगितली आहे, तशी उपासनाही सांगितली आहे. हे करताना सद्गुरूंनी जो मार्ग दाखविला आहे तो सत्यधर्म म्हणून पाळला पाहिजे. या सत्यधर्माचे सोनेरी पात्र सत्याने भरलेले असून ते प्राशन करण्यासाठी सद्गुरू चरण सांगितले आहे. उलटे केलेले सत्याचे जे मुख आहे ते सुलटे करून प्राशन करण्याकरिता हा आमचा मानवी जन्म आहे. सत्य हे उलटे असते हे आपणास फार उशिरा कळते. सत्याचा शोध घेणारा मात्र त्याच्या मागे सातत्याने प्रयत्नशील राहतो आणि त्यालाच सत्याचे दर्शन घडते. सत्य म्हणजे आनंद. या आनंदामध्ये कमतरता येऊच शकत नाही. सत्य आनंदाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहाणारच नाही; कारण आनंदासाठी मानव भुकेलेला असतो. या आनंदाचे वाटप करण्यासाठी हा मानवी देह आपण धारण केला आहे. शेवटी आनंद कोणाला नको आहे? सर्वांना आनंद प्रिय आहे. किंबहुना माणसाचे जगणे आनंदापासून आहे. जो या नरदेहाच्या अपूर्वतेकडे पाहत गेला त्या सर्वांना पूर्ण सत्य प्राप्त झालेले आहे. माणसातील अपूर्वतेमुळेच महानता या मानवी देहाला प्राप्त होते. सण, उत्सव, देव, धर्म हे आनंदाने जगण्यासाठी आहेत. जर जन्म आनंदात गेला तर मरणही आनंदातच होईल. तुम्ही आम्ही सगळेजण आनंदाचे पुत्र आहोत. अमृत तुम्हा आम्हामध्ये वास करत आहे. त्या अमृताचे आम्ही वारसदार आहोत. ही मालमत्ता आम्हास ऋषीमुनींनी दिलेली आहे. उपासनेशिवाय ती प्राप्त होऊ शकत नाही. ती जपण्याचे काम आम्हास करण्याचे आहे.भगवंत भक्तीसाठी उपासना फार महत्त्वाची मानलेली आहे. भगवंतावरील प्रेम हे अविनाशी असते. भगवंत नामाचे धन कोणी हिरावू शकत नाही. त्यासाठी आपल्या उपासनेत प्रेम, श्रद्धा भक्तिभाव पाहिजे. आपल्या मनातील चंचलता रोखण्यासाठी आत्मज्ञान जीवनात फार आवश्यक आहे. भगवंताच्या उपासनेने मन स्थिर होते. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवा. ज्या घरात भगवंताची उपासना होते, ते घर मंदिर आहे. भगवंताचा तेथे वास असतो. चारित्र्यसंपन्न, सुशिक्षित, सुसंस्कृत, बलशाली भारत घडविण्यासाठी दिव्य उपासनेचा सर्वांनी स्वीकार करावा.(धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी हे श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमीचे पीठाधीश्वर आहेत)

 

 

 

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक