शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २४, आजार असतो एकाला व बेजार होतात सगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 07:00 IST

विज्ञानाचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे तरीही अध्यात्माच्या नावाखाली, परमार्थाच्या नावाखाली लोक विज्ञानाकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्म एके अध्यात्म, परमार्थ एके परमार्थ हे जीवनविद्येला मुळीच मान्यच नाही.

ठळक मुद्देगंमत अशी की माणसाच्या ठिकाणी असलेली ही बुध्दी किती आहे याची माणसालाच कल्पना नाही.सायन्स असे सांगते की माणूस त्याच्या ठिकाणी असलेल्या बुध्दीचा वापर अर्धा टक्का सुध्दा करत नाही.जगातला हुशारातला हुशार माणूस सुध्दा मेंदूचा वापर फक्त दहा टक्के करतो

- सदगुरू श्री वामनराव पैविज्ञानाचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे तरीही अध्यात्माच्या नावाखाली, परमार्थाच्या नावाखाली लोक विज्ञानाकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्म एके अध्यात्म, परमार्थ एके परमार्थ हे जीवनविद्येला मुळीच मान्यच नाही. जीवनविद्या असे सांगते माणसाच्या ठिकाणी जी बुध्दी आहे तिची शक्तीही इतकी प्रचंड आहे की त्या बुध्दीच्या शक्तीची माणसाला कल्पनाच नाही हे आणखी एक आर्श्चय आहे. गंमत अशी की माणसाच्या ठिकाणी असलेली ही बुध्दी किती आहे याची माणसालाच कल्पना नाही. सायन्स असे सांगते की माणूस त्याच्या ठिकाणी असलेल्या बुध्दीचा वापर अर्धा टक्का सुध्दा करत नाही. अत्यंत बुध्दीमान माणसे जसे की आईनस्टाईन,न्यूटन, आपल्या देशातील लोकमान्य टिळक हे केवढे मोठे व्यक्तिमत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, पूर्वीच्या काळातले शिवाजी महाराज,आर्य चाणक्य हया मंडळींनी सुध्दा आपल्या आयुष्यात बुध्दीचा वापर केला तो केवळ दहा टक्के असे विज्ञान सांगते. जगातला हुशारातला हुशार माणूस सुध्दा मेंदूचा वापर फक्त दहा टक्के करतो आणि सामान्य माणसे आपल्या बुध्दीचा वापर अर्धा टक्का सुद्धा करत नाहीत. म्हणूनच जगात हाफ मॅड लोकांची संख्या जास्त आहे असे म्हणतात ती अगदीच काही अतिशयोक्ती नाही. कारण जीवन जगताना बुध्दीचा वापर करणे ही जी गोष्ट आहे ती लोक खंरतर करतच नाहीत. काही लोकांकडे पाहिले तर यांच्याकडे मेंदू नावाची गोष्ट आहे की नाही असा हा प्रश्न पडतो. जगात दु:ख आहे याचे कारण संसार,बायकामुले नाहीत तर हाफ मॅड म्हणजे अर्धा शहाणा व अर्धा मूर्ख माणूस हेच जगाच्या दु:खाचे कारण आहे. ही हाफ मॅड माणसे पूर्णपणे शहाणी झाल्याशिवाय हे जग सुखी होणे शक्य नाही. हे जग सुखी व्हायला पाहिजे म्हणजे अखिल मानव जात सुखी व्हायला पाहिजे असेल तर केवळ तुम्ही आम्ही सुखी होवून चालणार नाही तर आपण सर्वच सुखी झालो पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देतो की घरातील एक माणूस जर आजारी पडला तर घरातील सर्वच माणसे बेजार होतात. आजार असतो एकाला व बेजार होतात सगळे. असे का होते कारण एकाचे सुखदु:ख हे सर्वांचेच सुखदु:ख असते. जी गोष्ट घराची, तीच गोष्ट समाजाची, तीच गोष्ट राष्ट्राची, तीच गोष्ट विश्वाची म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहूना चराचर आपणची जाहला” हे विश्व आपले घर आहे.अशी संकल्पना इतर कुठल्या संस्कृतीत, इतर कुठल्या देशात आहे का? आपल्या भारतीय संस्कृतीत मात्र ही सुंदर संकल्पना आहे की हे विश्व आपले घर आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत आपण सर्व बंधू आहोत. ही संकल्पना जर जगात राबवली गेली तर जगात सुखच सुख निर्माण होईल.