शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मोहाच्या क्षणी स्वत:ला कसं सांभाळाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 04:07 IST

आकर्षणाच्या मोहापासून जे स्वत:ला सांभाळून घेतात ते सहसा त्या जाळ्यात अडकत नाहीत.

- विजयराज बोधनकरहा एक मोठा प्रश्न आहे की, जगायचं कसं? सांभाळून की भाळून... या तंत्रयुगात मोहात पाडणारे, आकर्षित करणारे क्षण आयुष्यात रोज नव्याने येतात आणि त्यावर भाळून जाण्याचेही प्रसंग येतात, यात जे भाळले जातात ते अनाठायी गुंततच जातात आणि शेवटास शून्य त्यांच्या हाती लागतं. याउलट आकर्षणाच्या मोहापासून जे स्वत:ला सांभाळून घेतात ते सहसा त्या जाळ्यात अडकत नाहीत. विश्वामित्र मेनकेवर भाळला आणि तपाचं सामर्थ्य घालवून बसला. मेनका हे आकर्षण आणि मोहाचं प्रतीक आहे.आज मोहवणारी अनेक माध्यमं आपल्या डोक्यावर क्षणाक्षणाला आदळत राहतात. टीव्हीवरील भुलवणाऱ्या जाहिराती, भडक मालिका, अस्वस्थ करणाऱ्या बातम्या, वासना उद्दीपित करणारे सिनेमे व वेबमालिका, वृत्तपत्रातल्या चकवणाऱ्या अनेक जाहिराती, व्हॉट्सअ‍ॅपचा विळखा, फेसबुकवरचे अनेक अस्वस्थ करणारे व्हिडीओ अशा अनेक गोष्टी आज विळखा घालून बसल्यात. याही पलीकडे ग्राहकराजाला पूर्णपणे जायबंदी करण्याची अनेक षड्यंत्रं रोज नव्याने रचली जातात आणि यावर हळवी आणि अज्ञानी माणसं भाळतात. परंतु ज्याला आपली गरज आणि वस्तुस्थितीची नेमकी माहिती असते तो स्वत:ला सांभाळून घेतो, या खोट्या पिंजऱ्यात अडकत नाही. अशी माणसं खरोखरच दूरदृष्टीची असतात, याचं कारण म्हणजे त्यांच्यावर झालेले पक्के संस्कार.उत्तम जगण्यासाठी ज्या माणसाकडे अढळ सशक्त विचार करण्याची क्षमता असते तो कुठल्याही लोंढ्यात वाहून जाऊच शकत नाही. खोट्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत राहण्यासाठी आणि मृगजळावर मात करण्यासाठीच संतश्रेष्ठ श्री तुकाराम, ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराज अशांच्या मार्मिक साहित्याचं एक जरी पान रोज वाचलं तरी आपल्या शाश्वत अस्तित्वाला कुणीही ओढून नेऊ शकत नाही. भाळण्यावरचं हेच एकमेव औषध आहे. या संत मंडळीचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक