शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

तो मूर्तिमंत जाण दया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 5:54 AM

इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी निर्माण करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी सिद्धबेटामध्ये चंद्रमोळी झोपडी थाटून, खळखळत्या इंद्रायणीचे पाणी पिऊन व सळसळत्या आजाण वृक्षाची ...

इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी निर्माण करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी सिद्धबेटामध्ये चंद्रमोळी झोपडी थाटून, खळखळत्या इंद्रायणीचे पाणी पिऊन व सळसळत्या आजाण वृक्षाची पाने खाऊन सच्चिदानंदांच्या कंदातील ब्रह्मनंद आपल्या भावार्थदीपिकेच्या रूपाने जनता जनार्दनास वाटला. संन्याशांची मुले म्हणून ज्यांनी उपेक्षा केली, त्यांना शापही नाही की उश्शापही नाही. कर्मठांनी झोळी मोडून टाकल्यानंतरसुद्धा माउलीने त्यांच्यावर आपल्या कृपेची छायाच पांघरली; म्हणूनच तर कारुण्याचा मूर्तिमंत महासागर म्हणजे संत ही संतत्वाची परिभाषा आपल्या आचरणाने महाराष्ट्रासमोर आणण्याचे काम या मायमाउलीने केले. अग्नीप्रमाणे भडकणाºया सामाजिक विकारावर आपल्या कारुण्यमय विचारांचे शिंंपण करतो तो संत, अशा दयावान, मूर्तिमंत कारुण्य पुरुषाचे वर्णन करताना ज्ञानोबा माउली म्हणतात -तो पुरुष वीरराया । मूर्तिमंत जाण दया ।मी उदयजातांची तया । ऋणिया लाभे ।निर्भर्त्सर भावनेने समाजातील सर्वच प्राणिमात्रांवर समान दृष्टीने दया करतो तोच खरा संतत्वाच्या पदवीपर्यंत जाऊन पोहोचतो. कारण संताचे येणे, राहणे व जाणेसुद्धा समाजासाठीच असते. समाजाच्या कल्याणासाठी आपला देह झिजविणे ही तर संतांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. गोठ्यामध्ये हंबरणाºया वासरासाठी चौखूर उधळत जाऊन त्याला दुग्धपान करण्याचे पाठ गायीला कोणी शिकवीत नाही. रडून रडून आक्रोश करणाºया बालकाला छातीशी कसे कवटाळावे यासाठी आईला कुठल्या विद्यापीठाची पदवी घ्यावी लागत नाही. पिलाच्या चोचीत दाणे भरविणाºया पक्षिणीला कुठल्या मंत्रांची गरज नसते. तद्वत संतांना दुसºयावर दया करण्यासाठी मंत्र-तंत्राची गरज लागत नाही. कारण, ज्याला-ज्याला तहान लागते, तो-तो पाण्याच्या शोधार्थ भटकू लागला अन् एकदाचे का पाणी मिळाले तर पाणी ते पिणाºयाला त्याची जात, धर्म, प्रांत, देश विचारत नाही, तर तहान भागविणे हेच पाण्याचे आद्यकर्तव्य होय. तद्वत कारुण्यमूर्ती संत देशकालाच्या व व्यक्ती आणि समाजाच्या कृत्रिम बंधनांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर समान भावनेने कृपा करण्याचे कामङ्ककरतात. निंदक, सज्जन, दुर्जन, भक्त या सर्वांवर समान भावनेने कृपावंत होणारा पर्जन्य म्हणजे संत होय. आपल्या पुत्र-पौत्रादिकावर तो जेवढ्या प्रमाणात ‘दया’ करतो, त्यापेक्षा चार पटीने अधिक जे आपले संबंधी नाहीत त्यांच्यावर कृपावंत होणारी मूर्तिमंत माउली म्हणजे संत. समाजात दैवी गुणांचे संवर्धन व्हावे म्हणून ज्ञानेश्वर माउलीने ज्ञानेश्वरीच्या १६व्या अध्यायात ज्या दैवी संपदेचे अर्थात दैवी गुणांचे वर्णन केले, त्यातील अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे ‘दया’ हा होय. जेव्हा धरणीमातेच्या गर्भातून बीजाचे अंकुर होऊन उर्ध्वगामी होता-होता पर्जन्याची याचना करू लागते, तेव्हा धोऽऽ धोऽऽ कोसळणाºया पर्जन्यधारा स्वत:ला धरतीच्या गर्भात गाडून घेतात आणि अंकुराचे रोपटे व्हावे म्हणून आपल्याङ्कसमर्पणातच आपल्या जीवनाची खरी सार्थकता आहे, असे पर्जन्यधारांना वाटते. तसेच असते दयावंत संतांचे. समाजातील दुर्गुण नष्ट व्हावेत व त्याने सद्गुणांची पाऊलवाट चोखाळावी म्हणून संत नावाची कारुण्यमूर्ती स्वत:ला समाजाच्या तळाशी गाडून घेते व समाजास उर्ध्वगामी करून समाजाचे दु:ख नाहीसे झाले की त्यास तोच ब्रह्मानंद वाटतो. ज्याचे वर्णन करताना तुकोबारायसुद्धा म्हणाले होते -दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा अन् दासीतुका म्हणे सांगो किती । तोचि भगवंताची मूर्ती ।प्रा. शिवाजीराव भुकेले