शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

खडतर कष्टानेच मिळतो सुखाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:50 IST

क्षणिक आणि अल्पकालीन सुखाच्या मागे लागून दीर्घकालीन दु:ख ओढवून घेणे उचित नाही.

- डॉ. भा. ना. संगनवार

सर्व काही नाशिवंत असतानादेखील माणूस अहोरात्र सुख मिळविण्यासाठी धडपडत असतो. मानवी जीवनात सुखापेक्षा दु:ख जास्त व यशापेक्षा अपयश जास्त असते. तरीदेखील प्रयत्न करण्याचे कुणीही थांबत नाही. महात्मा गौतम बुद्धांपासून संत तुकारामापर्यंत सुख आणि दु:ख याचा गंभीरतेने विचार करुन परामर्ष केला आहेच. क्षणिक आणि अल्पकालीन सुखाच्या मागे लागून दीर्घकालीन दु:ख ओढवून घेणे उचित नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सुखाची व्याप्ती दाखविताना सांगतात...सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ।।धरी धरी आठवण । मानी संताचे वचन ।।आपल्या आयुष्यात अथक प्रयत्नांती मिळणारे सुख हे तिळाच्या दाण्याएवढे असून दु:ख मात्र पर्वताएवढे आहे. म्हणूनच संत समागमातून अध्यात्माच्या विसाव्यात स्थिरावल्यास दु:खाची धार बोथट होऊन जगण्याची आणि नवीन निर्मितीची ऊर्मी निर्माण होते. भूतकाळाचा विचार सोडून वर्तमानात जगत असताना भविष्याचा वेध घेणारी व्यक्ती यशाची शिखरे पादाक्रांत करीत असते. अशाच व्यक्तींना सुखाची प्राप्ती होते. हे सर्व करीत असताना मानवी देह हा अत्यंत कमी कालावधीकरिता सक्रिय राहतो. हे सिद्ध करण्याची गरजच नाही. बाल, युवा, वृद्धावस्थेतून जात असताना सुरुवातीची आणि अखेरची अवस्था ही कर्म करण्यास असमर्थ स्वरुपाची असते. उरतो तो कालावधी फक्त युवा अवस्थेचा. ज्यामध्ये स्वहितासोबतच राष्ट्रहित, समाजहित व देशहिताने प्रेरित व्यक्तीच या समाजाचे नायक होतात. अन्यथा आयुष्यातील काळ व्यर्थ जातो.नेले रात्रीने ते अर्धे । बाळपण जराव्याधेतुका म्हणे पुढा । घाणा जूंती जसी मूढा ।।आयुष्यातील बहुतांश कालावधी बालपण, वृद्धापकाळ आणि व्याधी यामध्येच संपते. जे काही थोडेफार उरते ते माणूस अहिक सुख प्राप्त करण्याकरिता घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे संसाराचे ओझे वाहण्यात संपवितो. म्हणूनच संतांच्या माध्यमातून विरक्त भावनेने ईश सेवा केल्यास आत्मीक सुखाची प्राप्ती होते.जगाच्या कल्याणा संताची विभूती । देह कष्टविती परोपकारे ।।भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलबिंदू कोणता यावर चिंतन केल्यास एक लक्षात येईल की, दु:ख हाच मूलबिंदू आहे. प्रारंभापासून ते अंतापर्यंत दु:खाचा सामना प्रत्येकास करावा लागतोच. राजपुत्र सिद्धार्थ सर्व सुख-सुविधांच्या राशीवर पहुडला होता. परंतु वार्धक्य, रोग आणि मृत्यू या तीन दु:खांचे दर्शन झाले. त्यास वैराग्य प्राप्त झाले आणि पुढे बुद्ध होऊन ‘सर्वम दु:खम’ या आर्यसत्याचा त्यांनी उच्चार केला.

आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक या तीन बाबींमुळे मानवाचे जीवन हतबल आणि अगतिक झाले आहे. सर्व तत्त्वज्ञानाची सुरुवात दु:खामुळे जरी असली, तरी त्याचा अंत मात्र दु:ख पर्यवसाची नाहीच. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञान अध्यात्माच्या बळावर आशादायी म्हणून जागृत आहे. मनावर ताबा ठेवून सद्सद्विवेक बुद्धीने कार्य केल्यास दु:खाची बाधा होत नाही. सुख आणि दु:ख दोन्ही वेळी ‘एकमेका साह्य करु । अवघे धरु सुपंथ ।। या उक्तीप्रमाणे आचरण केल्यास ‘जो जे वांछील तो ते लाहो’ या ज्ञानेश्वरांच्या विभसुखाची प्रार्थना सत्यात उतरणारच, यात तिळमात्र शंका नाही.

( लेखक लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक