शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

छळतो या तना..श्रावण देतसे हास्य... अन् उल्हसितसे मना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 16:03 IST

कवितेतला श्रावण

‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’....    बालकवींच्या या ओळी श्रावणातल्या सुंदर सुंदर हरित छटांचे दर्शन घडवितात. निसर्गाच्या अनेक आविष्कारातील खास आविष्कार म्हणजे मनभावन श्रावण होय.‘आषाढातला उदास वारा छळतो या तनाश्रावण देतसे हास्य अन् उल्हसितसे मना’    आषाढातील उदासीनतेमुळे धीरगंभीर झालेल्या चेहºयावर जणू आनंद आणू पाहणाºया या श्रावणातील चैतन्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. आषाढातल्या पुनर्वसूच्या रिपरिपमुळे आणि म्हाताºया पुष्याच्या तुषार सिंचनाने ओलीचिंब झालेली धरा श्रावणातल्या नवसरींमुळे आणखी आनंदाने बाळसे धरू लागते. झुळझुळ वाहणाºया अवखळ पण निखळ मनाच्या झºयांमुळे, मंद पण शरीरावर शिरशिरी आणणाºया झुळूकामुळे मनात मखमली तरंग खुलवणाºया श्रावणाचा आनंद अनुभवण्याचे भाग्यच निराळे. काळ्याकुट्ट डोंगरावर फुलणाºया 'हरित तृणांच्या मळा' पाहण्याचा आल्हाददायी क्षण श्रावणातच उगम पावतात.पठारावर रंग व गंध बरसणाºया फुलांची किमया श्रावणातच सर्वाधिक पहायला मिळते.‘रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनूचे असतीआनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती’     श्रावणातल्या ऊन पावसाच्या खेळामुळे पूर्वेकडे मन आकर्षून घेणाºया इंद्रधनूमुळे प्रत्येकाच्या मनात रंगांच्या उकळ्या फुटतात. इंद्रधनुष्यातील सात रंगही श्रावणाचे महत्त्व सांगताना उल्हासित होऊन जातात. ‘उगवतीला उधळणारा सोनेरी पिवळा रंग मावळतीला तांबडा होऊन अंधारात विरघळून जातो,  त्याप्रमाणेच आपले जीवन आहे. निळ्या आकाशात काळे ढग भरले की, काळी आई हिरवळीने प्रफुल्लित होते मग आपल्या जीवनात आनंदाचे मोरपंख नाचू लागतात आणि या सर्व दैवी (अलौकिक) चमत्कारापुढे आपण नतमस्तक होतो. निसर्गाची निर्मळता पांढºयाशुभ्र रंगाप्रमाणे प्रांजळ आहे. त्यातच सर्वांचे मूळ लपून आहे.’ अशाप्रकारे अंतिम सत्य इंद्रधनूतून कदाचित प्रकटित होत असेल.‘काल स्वप्नात माझ्यामेला वैशाख जळालाकाळ्या आईच्या पोटूनहिरवा श्रावण फुलला’     वैशाख वणव्यातील दाहकता सहन करून मृगाच्या थेंबाने मोकळ्या झालेल्या मातीत जीव ओतून नवीन अंकुराला जन्म देणाºया ग्रामीण जीवनातील सर्वात मोठा कलाकार म्हणजे शेतकरी, सगळ्या जगाचा पोशिंदा होय. याच पोशिंद्याचे श्रावणापूर्वी पेरलेल्या 'बी'चे नवरूप पाहून मन हरखून जाते. त्या नवपालवीच्या क्षणांना पाहून त्याला धन्यता वाटते. पुष्याच्या हळूवार स्पर्शाने जमिनीवर पसरलेल्या चिखलाची दलदल धुऊन काढायला, आषाढाच्या अखेरीस पसरलेली दुर्गंधी दूर करण्यासाठी धावून येणाºया आश्लेष्याच्या श्रावण सरींमुळे माणसाच्या मनात साचलेले पापकर्मही धुवून निघतात.  ‘मघा’रूपातील सासूंच्या व ‘पूर्वा फाल्गुनी’ रूपातील सुनांच्या सरींमुळे वातावरणात आणखी वेगळेपणा येऊ लागतो.श्रावण देतो उमेद नवनिर्माणाचे छंदकार्यात चेतना अन्भरारी घेण्या स्वछंद     श्रावणाचा आनंद केवळ मानवालाच होतो असं नाही. झाडे, वेली, पशुपाखरे साºयांना श्रावण हर्षोल्लित करत असतो. चिखलात पाय रूतल्याने माणसाच्या हव्यासाची शिकार होऊ शकतो याची भीती असूनही रानोमाळ विहरणाºया हरणांना, सशाला पाहून मन गलबलून आल्याशिवाय राहत नाही. आपल्या मधूर स्वराने गाणे गात अवघी सृष्टी किलबिलाटाने जीवंत ठेवणाºया पाखरांचा आनंद गगनात मावेनासा होतो. एवढे दिवस बंद कळ्यात बंदीवान असलेल्या गंधाला मुक्त उधळणाºया सुमनांच्या प्रांजळ मनाचेही देखावे याच दिवसात अधिक प्रकर्षाने जाणवतात.-आनंद घोडके

टॅग्स :SolapurसोलापूरShravan Specialश्रावण स्पेशलAdhyatmikआध्यात्मिक