शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चारित्र्यवान माणसांचा सहवास इतरांसाठी परिसस्पर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 04:32 IST

मळलेली माणसं सत्पुरुषाच्या सहवासात परिष्कृत होतात.

- बा.भो. शास्त्रीस्वच्छ प्रतिमेची सर्वत्रच पूजा होत असते म्हणून विचारी माणसंं प्रतिमा निर्माण करत असतात. कदाचित त्यांंना घर नसतंं पण घरोघर त्यांंचे फोटो आपण पाहतो. त्यांच्याकडे पैसा नसतो, पण समाज पैसा खर्च करून त्यांचे जागोजागी पुतळे उभे करीत असतो. कदाचित त्यांंचे मंंदिरही बांधले जातात. कारण त्या पुरुषांंच्या चित्रात त्यांंचंं निर्मळ चारित्र्य असतं. तेच लोक ग्रंंथात, धर्मात, शब्दांंत दिसतात. मनात वसतात. मरणाला मारून ते आजही जिवंंंत आहेत. मलिन माणसं जे निर्माण करतात ते काळाच्या उदरात गडप होऊन जातं आणि तेजस्वी पुरुषांंचंं कर्तृत्व अमर होतंं. चिरंतन प्रकाश देतंं. चांगल्या वस्तूचंं स्वाभाविक आपल्याला आकर्षण असतं. कुणालाही प्रत्येक वस्तू शुद्ध हवी असते. दुधात, पाण्यात, फळात, विचारात, आचारात व उच्चारात भेसळ नको. फार काय दारू तर नाही पण विषही भेसळीचं नको असतं. पण हाच निकष आपण स्वत:ला कधीच लावत नसतो. सर्वांना सोयीचा माणूस आवडतो. आपण इतरांंच्या सोयीचं होण्याचा कधीच प्रयत्न करीत नाही. चोरी करणंं बेइमानी आहे हे चोरांना पण कळतं. म्हणून तो स्वत:साठी साथीदार इमानदार हवा अशी सगळ्याच चोरांंची अपेक्षा असते. मग माणसंं मळतात कशी? भौतिक जग निर्माण करणारा स्वत:ला का तयार करीत नाही. दुसरा आपल्यासाठी सज्जन असावा ही आपली अपेक्षा रास्त आहे. मग आपण पण याच्यासाठी सज्जन का असू नये? गीता म्हणते,‘‘आत्मौपम्येन सर्वत्र समंं पश्यति योर्जुनसखं वा यदि वा दु:खं स योगी परमो मत:’’स्वत:ला दुसऱ्यात पाहता येतं तो योगी आहे. आपल्याला दु:ख नको. त्यालाही नकोच असतं. आपल्याला सुख हवं तसंं त्यालाही हवं असतं. यालाच दृष्टी म्हणतात. डोळे सगळ्यांनाच आहेत. दृष्टी नाही. पाप व पुण्याचंं मूळ दृष्टीत आहे. बाहेरचं जग डोळ्यातूनच अंंतरात प्रवेश करतंं. दृष्टी व सृष्टीत सतत व्यापार चालत असतो. दृष्टीला नको ते नाकारता आलंं पाहिजे, हवंं ते स्वीकारता आलं पाहिजे. आधी दृष्टीलाच मळ लागतो. नंंतर मनात व्यापतो. मनातून बृद्धी व आत्म्यात पसरत जातो. माणसाचा जन्म होतो तेव्हा तो कोराच असतो. ना हिंंदू, ना मुस्लीम, ना जैन ना बौद्ध एकदम सफेद असते. आम्हीच त्यात जात, धर्म, पंथ व प्रांताचे रंग भरत असतो. जसा आभाळातून पाण्याचा थेंंब पडतो. तसाच स्वच्छ, मधुर, प्रसन्न व थंड असतो हा माणूस. बाळाचे डोळे पाहा, किती सुंंदर दिसतात. ते विकार विकल्परहित असतात. कवी भास्कर म्हणतात,‘‘जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्नतैसे रजस्तमी विहिन मन निर्मळ होआवे’’जमिनीतल्या वस्तूंंच्या गुणधर्माची जशी संगत मिळते तसं पाण्याचंं रंंगरूप बदलतंं. थेंंब आगीत पडला की जळतो. मातीत मुरतो, शिंंपल्यात मोती होतो, सागरात खारा होतो, दारूत दारू तर आमरसात अमृत होतो. गोड, खारट, तिखट, आंंबट, संजीवनी व विष ही त्याचेच बदललेली रूपं आहेत. हा सगळा संगीताचा परिणाम आहे. असंच आहे माणसाचं रेखाचित्र. त्यात आपणच रंग भरत असतो. कधी आईबाप, कधी शिक्षक, कधी मित्र, कधी नातेगोते यांच्या सहवासात माणसं रंगत जातात. सत्संगात रमून जातात. कुसंगाने भंगून जातात. मन मळतं, बुद्धी मळते, यावर काही उपाय आहे की नाही?हेच श्रीचक्रधर सूत्रातून सांंगतात,‘‘उजळलेयाचेनी संगे मैळला उजळे’’घासनीच्या संगतीने भांंडं उजळतं. तुरटीच्या संगतीने पाणी शुद्ध होतं, अग्नीच्या संगाने लोखंंडाचा जंंग जातो. साबणीच्या संगतीत वस्त्र स्वच्छ होतं. अशीच मळलेली माणसं सत्पुरुषाच्या सहवासात परिष्कृत होतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक