शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गुरुमंत्र : शरीर साक्षात परमेश्वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 10:58 AM

जीवनविद्या तत्त्वज्ञान असेही सांगते की ‘शरीर हे एक दिव्य संगणक’ (Divine Computer) देखील आहे.

- प्रल्हाद वामनराव पै(जीवनविद्या मिशन)

‘देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांना उत्तम आरोग्य दे आणि देवा यांचे रक्षण कर’ असे म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतात. त्यामुळे आपल्या मनात असलेले कोरोना संक्रमण, चिंता,  काळजी आणि दु:खाचे विचार कमी होतील.

जीवनविद्या तत्त्वज्ञानातील एक क्रांतीकारक सिद्धांत म्हणजे ‘शरीर हे साक्षात परमेश्वर’. त्याचप्रमाणे जीवनविद्या तत्त्वज्ञान असेही सांगते की ‘शरीर हे एक दिव्य संगणक’ (Divine Computer) देखील आहे. वास्तविक कॉप्युटर हे एक मानवनिर्मित यंत्र आहे. मात्र शरीररूपी दिव्य कॉप्युटरची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे. 

आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की शरीराचा आणि कॉप्युटरचा काय संबध? याचे उत्तर असे की, कॉप्युटरला आपण जे फिडींग करतो त्याप्रमाणे कॉप्युटर आपल्याला रिझल्ट देत असतो. माणूसदेखील विचार, उच्चार आणि आचार या कर्माद्वारे शरीराला सतत फिडींग करत असतो. आपण जर कॉप्युटरमध्ये चुकीचे फिडींग केले तर त्यातून मिळणारा रिझल्टदेखील चुकीचा असेल. अगदी त्याचप्रमाणे शरीररूपी दिव्य कॉप्युटरमध्ये आचार, उच्चार आणि विचारांच्या माध्यमातून जर चुकीचे फिडींग केले गेले तर शरीर आपल्याला दु:ख स्वरूपात त्याचा रिझल्ट देते. 

मात्र याउलट जर आपण जाणिवपूर्वक आपल्या शरीराला शुभ विचार, शुभ उच्चार आणि सत्कर्माचे फिडींग केले तर त्याचा परिणाम सुख स्वरूपात आपल्याला मिळू शकतो. दुसरा मुद्दा असा की, ज्याप्रमाणे आपण स्वत:च्या शरीररूपी कॉप्युटरला सतत फिडींग करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपण इतर लोकांच्या शरीररूपी कॉप्युटरलादेखील फिडींग करत असतो. म्हणजेच सर्व लोक सतत स्वत:च्या आणि इतरांच्या शरीररूपी कॉप्युटरला फिडींग करत स्वत:चे अथवा इतरांचे जीवन घडवत अथवा बिघडवत असतात. माणसाला व समाजाला जर सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य हवे असेल तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवूनच विचार, उच्चार आणि आचार करायला हवेत.

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या नकारात्मक वातावरणामुळे घरात एकत्र असूनही कुटुंबात चिडचिड आणि भांडणतंटे वाढलेले आढळत आहेत. घराबाहेर भितीचं वातावरण आणि घरात कौटुंबिक कलह अशी बिकट परिस्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे. या नकारात्मक वातावरणातून बाहेर पडण्यासाठी जीवनविद्या तत्त्वज्ञान सांगते की, समाजातील प्रत्येकाने सद्य परिस्थितीत सतत सकारात्मक आणि सहकारात्मक विचारांचे फिडींग या दिव्य कॉप्युटरला द्यायला हवे. कारण तुम्ही जे फिडींग करणार त्यानुसार तुमचे जीवन घडणार आहे. यासाठी थोर तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै निर्मित ‘विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना’ घरातील सर्वांनी एकत्र येऊन म्हटल्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल.

विश्वप्रार्थनाहे ईश्वरा,सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य देसर्वांना सुखात आनंदात,ऐश्वर्यात ठेवसर्वांचं भलं कर, कल्याणकर, रक्षण करआणि तुझे गोड नाम मुखातअखंड राहू दे.

या नकारात्मक परिस्थितीवर मात या सोबतच सर्वांच्या भल्यासाठी प्रत्येकाने सरकारने दिलेल्या सूचनादेखील तंतोतत पाळणे गरजेचे आहे. घरात सुरक्षित वातावरणात राहून सर्वांसाठी प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करत या नकारात्मक परिस्थितीवर आपल्याला मात करायची आहे.त्याचप्रमाणे सध्या कोरोना महामारीला नष्ट करण्यासाठी समाजातील अनेक लोकांना अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलिस, सफाई कामगार, प्रसारमाध्यमातील कर्मचारी असे अनेक लोक या संकटकाळातही स्वत:चे कर्तव्य उत्तमपणे बजावत आहेत. 

या सर्वांबद्दल समाजातालील प्रत्येकाने कृतज्ञ असायलाच हवे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीदेखील या काळात घरातच राहून स्वत:चे मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि इतरांच्या कुटुंबीयांसाठीदेखील कृतज्ञता व्यक्त करणारी ही साधना करावी. सतत ‘देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांना उत्तम आरोग्य दे आणि देवा यांचे रक्षण कर’ असे म्हणून ते ही कृतज्ञता व्यक्त करू शकतात. ज्यामुळे त्यांच्या मनात असलेले कोरोना संक्रमण, चिंता, काळजी व दु:खाचे विचार कमी होतील. अशा पद्धतीने कोरोना नामक हे वैश्विक संकट दूर होऊन लवकरच सुखाचे, ऐश्वर्याचे आणि आरोग्याचे दिवस परत येतील. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक