शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

देव आणि संत एकचं आहेत..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 18:26 IST

देव अवतारात मर्यादित कार्य केले. संत अवतारात व्यापक कार्य केले.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी  

या जगात परमेश्वर अवतार का धारण करतो? याचे उत्तर देतांना गीता माऊली म्हणते -परित्राणाय साधूनां । विनाशायच दुष्कृतां ॥धर्म संस्थापनार्थाय । संभवामि युगे युगे ॥

साधूंच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी व धर्माच्या संस्थापनेसाठी मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार घेतो पण प्रश्न असा आहे की, अवतरणे म्हणजे नेमके काय..? खाली येणे का..? मग देव जर सर्वत्र आहे तर, तो खाली येतो म्हणजे काय..? देव अवतरतो म्हणजे काय..? माऊली म्हणतात,पै मूर्तीचेनि मेळे । तो मूर्तिच होऊनि खेळे ॥परि अमूर्तपण न मेळे । दादुलयाचे ॥

त्याच्या अमूर्तपणाला धक्का न लागता तो मूर्तरूपाला आला म्हणजे जो परमात्मा गोचर नव्हता तो इंद्रिय गोचर झाला. अवतार म्हणजे वेगळे काही नाही. अवताराचे प्रयोजन संपले तरी कार्य शिल्लकच राहते. देव विचार करतो की जे साधूही नाहीत व जे दुर्जनही नाहीत असे अज्ञानी लोक तर दु:खातच आहेत अशा लोकांचा उद्धार तर झाला पाहिजे. देवत्व न सुटता जीवाचा उद्धार झाला पाहिजे. त्यासाठी मनुष्यरु पाने देवाने अवतार घेतला व समाज उध्दाराचे कार्य केले. उदाहरणच द्यावयाचे झाल्यास,महाविष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥ब्रह्मसोपान तो झाला । भक्ता आनंद वर्तला ॥किंवाआम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी ॥बोलिले जे ऋषी । साचभावे वर्ताया ॥ 

म्हणून संत हे ईश्वराचे अवतार आहेत. ते दिसायला मनुष्य असले तरी असायला देवच आहेत. देव अवतारात मर्यादित कार्य केले. संत अवतारात व्यापक कार्य केले. नृसिंह अवतारात भगवंताने फक्त हिरण्यकश्यपुला मारले पण संत अवतारात रेड्याच्या मुखातून वेद वदविले, भिंत चालवली, हरिपाठासारखे, ज्ञानेश्वरीसारखे, वाङमय  निर्माण करु न जड जीवाचा उद्धार केला. देवाचा अवतार व्यक्ती उद्धारासाठी झाला. संताचे कार्य मात्र व्यापक आहे. संत जे अवतार घेतात ते सकल समाजाला मार्ग दाखवण्यासाठी व मार्ग प्रशस्त करण्यासाठी. जेव्हा निवृत्तीनाथ मार्ग दाखवतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा मार्ग प्रशस्त करतात. संताची कृपा अमर्याद आहे. तुकोबा म्हणतात,कृपादान केले संती । कल्पांतीही सरेना ॥संतांच्या कृपेचे वर्णन करताच येत नाही.तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वानू ॥

(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, भ्रमणध्वनी - 9421344960 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक