शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

दिवाळी : प्रकाशाचा उत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 04:14 IST

दीपावलीचा सण थंडीच्या काळात येतो. याला दोन प्रमुख कारणे आहेत. थंडीमध्ये आपल्याला भूक खूप लागते. आहारात तेल-तुपाचा समावेश असेल तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. आश्विन महिन्यात शेतातील नवीन धान्य घरात येते, संपन्नता असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा केल्यामुळे मनाचे आरोग्यही चांगले राहते.

दीपावलीचा सण थंडीच्या काळात येतो. याला दोन प्रमुख कारणे आहेत. थंडीमध्ये आपल्याला भूक खूप लागते. आहारात तेल-तुपाचा समावेश असेल तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. आश्विन महिन्यात शेतातील नवीन धान्य घरात येते, संपन्नता असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा केल्यामुळे मनाचे आरोग्यही चांगले राहते. आकाशकंदील, रांगोळी, दिवाळी पहाट आणि दिवाळी अंक या गोष्टी दिवाळीच्या सणाचा आनंद वाढवित असतात. दीपावलीचा सण हा अंधाराून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, आळसाकडून उद्योगशीलतेकडे आणि अनीतीकडून नीतीकडे नेणारा ठरतो अशी प्रार्थना आहे. ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी याच दीपोत्सवाच्या पाच दिवसांची महती सांगितली आहे. याशिवाय, दिवाळीच्या दिवसांत फटाके वाजवू नका. तसेच, सण साजरे करीत असताना खर्च कमी करून बचत करावी आणि समाजातील गरीब-गरजू लोकांना मदत करावी, असाही संदेश दिला आहे.दिवस पहिला : धनत्रयोदशी - धन्वंतरी पूजनसोमवार, ५ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी- धन्वंतरी पूजन आहे. या दिवशी दीपदान व परोपकार करण्यास सांगण्यात आले. त्यासंबंधीची एक पौराणिक कथाही आहे. गरीब-गरजूंनाही दीपावलीचा उत्सव साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. व्यापारी लोक या दिवशी नवीन वर्षाचे हिशोब लिहिण्याच्या वह्या आणतात. महिला घरातील सोन्याचे दागिने स्वच्छ करून त्यांची व धनाची पूजा करतात. या दिवशी धन्वंतरी यांचा जन्म झाला. त्यांची जयंती साजरी केली जाते.दुसरा दिवस : नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नानमंगळवार, ६ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी आहे. या दिवशी थंडीमध्ये त्वचा तजेलदार आणि टवटवीत राहण्यासाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी अभ्यंगस्नान केले जाते. भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराला ठार मारले. त्याने मृत्यूसमयी कृष्णाकडे वर मागितला. आपल्या मृत्यूच्या दिवशी सर्वांनी अभ्यंगस्नान करावे आणि सर्वत्र दिवे लावून हा दिवस साजरा केला जावा.तिसरा दिवस ; लक्ष्मी कुबेरपूजन, अलक्ष्मी निस्सारणबुधवार, ७ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाली आश्विन अमावस्या असल्यामुळे याच दिवशी प्रदोषकाली म्हणजे सायं. ६ वाजून २ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत लक्ष्मी कुबेरपूजन करावयाचे आहे. लक्ष्मीची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी , कीर्तीलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी आठ रूपे आहेत. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! सन्मार्गाने मिळविलेला पैसा आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचीही पूजा करून तिचे गावाबाहेर विसर्जन केले जाते. अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात शस्त्र म्हणून झाडू असतो. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे. कुबेर हा संपत्तीचा रक्षक म्हणून मानला जातो. म्हणून त्याचीही लक्ष्मीबरोबर पूजा करतात.चौथा दिवस : बलिप्रतिपदा,गोवर्धनपूजा, अन्नकूटगुरुवार, ८ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आहे. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. या दिवशी श्री विष्णूने वामन बटूचे रूप घेतले आणि बलीकडे तीन पावले जमीन मागितली. एका पावलात पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारताच बलीने आपले डोके पुढे केले. वामनबटूरूपी विष्णूने तिसरे पाऊल बलीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात पाठवले. बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. या दिवशी समतेचा संदेश देणारा ‘अन्नकूट’ हा कार्यक्रम बºयाच मंदिरात सुरु असतो. व्यापारी लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजलेल्या हिशोबाच्या नवीन वह्या या दिवसापासून वापरण्यास प्रारंभ करतात.पाचवा दिवस :यमद्वितीया, भाऊबीजशुक्रवार, ९ नोव्हेंबर रोजी यमद्वितीया, भाऊबीज आहे. भाऊबीज हा सण बहीण-भावाचे नाते दृढ करणारा आहे. या दिवशी यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी भाऊबीजेसाठी गेला होता. त्यामुळे गेली वर्षानुवर्षे भाऊबीजेची प्रथा आजही सुरू आहे. आजच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते.

टॅग्स :DiwaliदिवाळीAdhyatmikआध्यात्मिक