शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ध्यास पंढरपूरच्या विठ्ठलाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 05:05 IST

आषाढी एकादशी जशी जशी जवळ येऊ लागली, वारीच्या बातम्या मिळू लागल्या, तसं मन बेचैन झालं. आपणही जावं पंढरपूरला? का इतकी पंढरीची ओढ. काय आहे तिथे एवढं

- शैलजा शेवडेआषाढी एकादशी जशी जशी जवळ येऊ लागली, वारीच्या बातम्या मिळू लागल्या, तसं मन बेचैन झालं. आपणही जावं पंढरपूरला? का इतकी पंढरीची ओढ. काय आहे तिथे एवढं, की लाखो वारकरी तिथे मोठ्या भक्तीभावाने जातात. तिथे विठ्ठल आहे; पण विठ्ठलमूर्ती तर कित्येक देवळात असतात. मग या मूर्तीचे वैशिष्ट्य काय, पंढरपूरचे महत्त्व काय, तिथे क्लेशहारिणी चंद्रभागा आहे. पंढरपूरला जी पांडुरंगाची मूर्ती आहे, त्या मूर्तीची कुणी प्रतिस्थापना केली नाही. ती स्वयंभू आहे. प्रत्यक्ष परब्रम्ह, विठ्ठल आपल्या भक्ताला पुंडलिकाला भेटायला तिथे आले आहेत. थांबले आहेत.उदंड देखिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे,ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठेऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठेतुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवेआदि शंकराचार्य पांडुरंगाष्टक स्तोत्रात म्हणतात.महायोगपीठे तटे भीमरथ्यां ।वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै:।समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं ।परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम।भीमरथी नदीवर म्हणजेच भीमा नदीच्या तीरावर महायोगाचे योगपीठ असलेल्या ठिकाणी (पंढरपूर येथे) आपला भक्त पुंडलिकाला वर देण्यासाठी मोठमोठ्या ऋषिमुनींसह जो थांबला आहे, जो आनंदाचा कंद आहे, त्या परब्रम्हस्वरूप पांडुरंगाचे मी भजन करतो. पंढरपूरला महायोगपीठ का म्हणले आहे, तर तिथे हा योगी विठ्ठल आहे. ज्ञानेश्वरही त्याला योगी म्हणतात. योगी विठ्ठल भक्तांनाही योगी बनवतो. म्हणून ते स्थळ महायोगपीठ लुब्धली नादी लागली समाधी। मूढजन नरनारी लोकांरेपंडितज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्ध साधकारे।।असे पंढरीच्या वाळवंटातील दृश्य संतांनी वर्णिलेले आहे.

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी