शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

साधकावस्थेचा गाभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 00:45 IST

पार्था, ह्या मानवी विश्वात आपण कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहोत हा भाव आपल्यापाशी असता कामा नये. मानी स्वभावाचा पूर्ण अभाव म्हणते अमानित्व.

- वामनराव देशपांडेअमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।आचार्योपासनं शौचंंं स्थैर्यमात्मविनिग्रह: ।।गीता:१३:७।।पार्था, ह्या मानवी विश्वात आपण कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहोत हा भाव आपल्यापाशी असता कामा नये. मानी स्वभावाचा पूर्ण अभाव म्हणते अमानित्व. आपल्यापाशी ढोंंगीपणा असू नये. अदम्भित्व म्हणजे दिखाऊपणाने जगण्याचा पूर्ण अभाव. हिंसक मनोवृत्ती असू नये. अहिंंसा हा साधकावस्थेचा गाभा आहे. मन, वाणी आणि शरीर बलाने कुणालाही न दुखवणे, कुणाच्याही मनाला यत्किंंचितही इजा न करणे म्हणजे अहिंसा. क्षान्ति म्हणजे अपूर्व अशी क्षमावृत्ती. सरळ विनम्रवृत्ती, आर्जवी मनोवृत्ती, आपल्या सद्गुरूंच्या ज्ञानभारल्या आज्ञेत राहणे, गुरूसेवेत गर्क होणे, अंतर्बाह्य शुद्ध आचरण, विलक्षण स्थैर्य आणि मनावर पूर्ण ताबा हे गुण महत्त्वाचे आहेत. भगवंतांनी प्रस्तूत श्लोकातून सर्वच साधक भक्तांंना, साधकाचे एकूण व्यक्तिमत्त्व कसे असावे, त्याची मनोवृत्ती कशी असावी, भगवंतांशी तादात्म्य पावण्यात देहबुद्धी जी आड येते, तिला दूर कसे लोटावे, यावर उपदेश करताना, अगदी सहजपणे देहबुद्धीने जगणाऱ्या साधकांंना घेरून बसलेल्या दोषांंवर जणू प्रकाशच टाकला आहे. एकदा का प्रसिद्धीच्या झोतात माणूस आला की, मानीपणा अंगात संचारतो. तो नष्ट होण्यासाठी सत्पुरुषाचा सहवास लाभणे अत्यंत आवश्यक आहे. कारण संतपुरुषांना कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा नसते. त्यांच्यापाशीच अमानित्व नांंंंदत असते. अशी श्रेष्ठ संंतमंडळी इतरांचा सन्मान करण्यात धन्यता मानतात. अशा श्रेष्ठ पुरुषांंच्या सहवासात दीर्घकाळ राहिले तरच स्वत:मधले मानीपण लोप पावते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक