सचेतनी द्वेष अचेतनी पूजा ! भक्ती गरूडध्वजा केवी पावे !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:57 PM2019-11-09T18:57:09+5:302019-11-09T18:58:01+5:30

आप-पर भाव रहित आचरण असणं हाच खरा भागवत धर्म आहे.

Conscious hatred unconscious worship ! Devotion when will Find ! | सचेतनी द्वेष अचेतनी पूजा ! भक्ती गरूडध्वजा केवी पावे !!

सचेतनी द्वेष अचेतनी पूजा ! भक्ती गरूडध्वजा केवी पावे !!

Next

- हभप भरतबुवा रामदासी ( बीड )

राजा जनकाने नव योगेश्वरांना विचारले, महाराज. ...
अथ भागवतं ब्रूत यद् धर्मो यादृशो नृणाम्! 
यथा चरति यत् ब्रूते यै लिडगैर् भगवत् प्रियः!!

मनुष्यामध्ये भागवत कोणाला म्हणावे, भगवत् भक्तांचा धर्म कोणता, भगवंताचा भक्त माणसाशी कसा वागतो, कसा बोलतो, त्याचा स्वभाव कसा असतो, आणि तो कोणत्या लक्षणांमुळें भगवंताला प्रिय होतो. .? राजा जनकाच्या या प्रश्नांचे उत्तर देतांना "हरि "नावाचे योगींद्र राजाला म्हणाले;
राजा. ...!
सर्व भूतेषु यः पश्येद् भगवद् भावमात्मनः! 
भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः! !

सर्व प्राणिमात्रात भगवंत आणि भगवंता मध्ये सर्व प्राणिमात्रांना जो बघतो तोच खरा भागवत होय. दृश्य प्रपंचात ब्रह्म आणि ब्रह्मात जो दृश्य प्रपंचा ला बघतो तोच खरा भगवद् भक्त होय ज्याला हे जग विष्णु मय असल्याचे ज्ञान झाले तोच खरा ईश्वराचा भक्त समजावा. 
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देखील ईश्वर भक्तांचे असाधारण धर्मरूप लक्षण सांगतांना म्हणतात; 
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म! भेदाभेद भ्रम अमंगळ!!
आईकाजी तुम्ही भक्त भागवत! कराल ते हीत सत्य करा!!

आप-पर भाव रहित आचरण असणं हाच खरा भागवत धर्म आहे. योगेश्वरांनी भागवत धर्माचे रहस्य सांगतांना भक्ताचे तीन प्रकार वर्णन केले आहेत. 
1) प्राकृत भक्त  2) मध्यम भक्त 3)आणि उत्तम भक्त. 
प्राकृत भक्ताचे वर्णन करतांना महर्षी व्यास महाराज म्हणतात; 

आचार्यामेव हरये पूजा यः श्रद्धये हते !
न तद् भक्तेषु चान्येषु स भक्त: प्राकृत स्मृति:!!

जो भक्त फक्त पुजा, अर्चा करण्यातच देवाची भक्ती समजतो. कधी अनाथ, अपंगांची, दीन दुबळ्यांची, गोर गरीबांची सेवा करीत नाही. फक्त मी करतो तीच भक्ती श्रेष्ठ आहे असे समजतो तो प्राकृत भक्त समजावा अशा भक्तांना संप्रदायाचा, धर्माचा, खूप मोठा अभिनीवेश असतो. तो सतत इतर संप्रदायाला व इतर धर्माला तुच्छ समजतो. आज बहुतांशी लोक देवाची तासन् तास पुजा करतात. पारायणें करतात,व्रत वैकल्यें करतात,पण चालत्या बोलत्या दिसणार्‍या जिवंत माणसाचा द्वेष करतात. ज्याला दिसणार्‍या जिवंत माणसावर प्रेम करता येत नाही तो न दिसणार्‍या देवावर कसा प्रेम करील. .? हे धर्म बाह्य आचरण देवाला तरी आवडेल का. .? नामदेव महाराज म्हणतात; 

सचेतनी द्वेष अचेतनी पूजा!
भक्ती गरूडध्वजा केवी पावे!!

असा भक्त म्हणजे प्राकृत भक्त समजावा. भक्ती शास्त्रात अशा  भक्तीला फारसे महत्व नाही. आता मध्यम भक्त आणि उत्तम भक्तांचे वर्णन पुढील लेखात करू यात.

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या संपर्क क्रमांक 8329878467 )

Web Title: Conscious hatred unconscious worship ! Devotion when will Find !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.