व्यापकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 04:48 AM2020-07-29T04:48:23+5:302020-07-29T04:48:27+5:30

- इंद्रजित देशमुख व्यापकता हेच पुण्य संकुचितता हेच पाप. ही किती साधी सरळ व्याख्या आहे. मी माज्यातील चार गोष्टीतील ...

Comprehensiveness | व्यापकत्व

व्यापकत्व

Next

- इंद्रजित देशमुख
व्यापकता हेच पुण्य संकुचितता हेच पाप. ही किती साधी सरळ व्याख्या आहे. मी माज्यातील चार गोष्टीतील व्यापकता आणि संकुचितता तपासली तरी मी पुण्यवान होऊन जगेन. माझा भाव व्यापक आहे. माज्या सोबतच्या सर्वांविषयी मी व्यापक आहे. सर्व जीवांचा आदर करतो आहे. त्यांचे अस्तित्व मान्य करून त्यांच्या हिताला बाधा माज्यामुळे येणार नाही, ही भावनाच आम्हाला विशाल बनवते. आणि सगळ्यांना सामावून हृदय आभाळाएवढे करते. माज्या मनात सुरू असलेला संवाद हा संकुचितते पासून दूर आहे.जगताना, व्यक्ती आणि परिस्थितीशी झगडताना विचारात नकारात्मकता येत नाही. माझे विचार टोकदार होत नाहीत. हा स्वसंवाद सुरू असताना संवाद टोकदार असेल तर तो मलाच जखमा करतोय, याची जाणीव झाली की, विचारांमध्ये गोडवा आणण्यावर माझी अंतर्मुखता कार्य करेल. कारण स्वसंवादातील नकारात्मकता खूप जीवनऊर्जा घेऊन जाते, ही ऊर्जा आम्हांला कमकुवत करते. ज्या विचारात उदात्तता, खेळकरपणा, विष संपवून अमृत
निर्माण करण्याची ताकद आहे, ते विचार
आम्हाला दिवसभरात प्रचंड उर्जा देतात. वाणीतील प्रत्येक शब्द सहअस्तित्वाला प्रेरणा देणारा, जिव्हाळ्याचा, जखमा भरून काढणारा, ओलाव्याचा असेल आणि याच भाव, विचार, वाणी यांनी युक्त अशी दिवसभराची कृती झाली की, व्यापकतेने भरलेले जीवन हे आनंदाचा कंद होऊन जाईल. तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे आमचे जगणे मग..
न लगे सांगावा परिमळ।
वनस्पति मेळ हाकारूनि।
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी।
धरिता ही परी आवरेना।।

Web Title: Comprehensiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.