शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

येणे सुख रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत..!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 01:51 IST

तुम्ही केलेल्यानिःस्वार्थ कर्मातून समाधान मिळेल, त्याला बाहेरच्या जगात शोधू नका...

मनुष्य एकवेळ भुकेला राहू शकतो पण तो एकटेपणा जास्त काळ सहन करू शकत नाही. त्याला एकटेपण खायला उठतो. नंतर मग तो स्वतःशी संवाद साधत जातो. ज्यावेळी रस्त्यावर अशा व्यक्ती लोकांच्या नजरेस पडतात तेव्हा त्यांना वेडं ठरवायला सुरुवात होते. खरतर ते स्वतःच्या आयुष्याला पडलेल्या कोड्याचे उत्तर शोधत राहतात. पण कदाचित ते त्यात इतके गुरफटत जातात कि स्वतःच्या इंद्रियांवरचे नियंत्रण सुटून आयुष्य भरकटत जाते. पण अध्यात्माच्या क्षेत्रात ह्याच अवस्थेला फक्त जितेंद्रिय राहून परमात्म्याशी संवाद स्वतःच्या आयुष्याचा शोध घेत समाज कार्य करत प्रत्येक जीवाच्या आनंदासाठी झटणाऱ्याला संत, महात्मे अशी उपाधी मिळते. ''येणे सुख रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत..!''हा तुकाराम महाराजांचा अभंग माणसाला एकांताचे महत्व अधोरेखित करून देतो...

 संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबाराय , थोर समाजसुधारक गाडगेमहाराज,कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य खर्ची करणारे बाबा आमटे यांसारख्या महात्म्यांना लोकांनी अगोदर वेडेच ठरवले होते. नंतर मात्र त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात..म्हणून वेडेपणा अंगी बाळगूनच हाती घेतलेल्या कार्यात स्वतःला पूर्णतः झोकून द्यावे.. अथक परिश्रमांचा सिलसिला अखंडपणे सुरु ठेवावा जोपर्यंत हाती घेतलेलं ते कार्य सिद्धीस जात नाही... 

आयुष्यात समाधानी राहायचा मूळ स्त्रोत हाच आहे, "स्वतःशीच प्रामाणिक" व्हा. आपल्याला आतून वाटते काहीतरी एक, आपण बाहेर दाखवतो काहीतरी दुसरेच — हा लपाछपीचा खेळ एक दिवशी मोठ वादळाचे रूप घेतो. आयुष्यात कोणतेही काम असो त्याला स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहून आपले हंड्रेड परसेंट त्याला द्यायचे. दुसऱ्यांना चांगले वाटले पाहीजे, त्यांना माझे काम भावले पाहिजे, त्यांनी मला लाईक करायला हवे, माझी वाहवाह करायला हवी म्हणून मी हे काम उत्कृष्टरित्या पार पाडेल असे करू नका. जर ह्याच मानसिकतेसोबत जगलात तर आयुष्यात कधीच समाधानी नाही होणार.

पण जेव्हा आपण काही चुकीचे करतो तेव्हा ते करण्याअगोदर आजूबाजूला नक्की पाहतो परंतु "आपल्या आतल्या बाजूला" पाहायचे आपण विसरतो. ते हृदय, ते मन आपल्याला पाहत असते. आजूबाजूच्या वाईट वाटो किंवा नको पण आपल्याला आतून माहित असते आपण चुकीचे करतोय.आयुष्यात खरे समाधान "पूर्ण प्रामाणिकपणे" काम करून त्यात मिळवण्यात असते. हे आपण स्वतःसाठी करतो — दुसऱ्यांनी पाहायला हवे म्हणून नाही. समाधान तुम्हाला आतून येणाऱ्या भावनांनी मिळेल, त्याला बाहेरच्या जगात शोधू नका. कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी!! समाधान, आनंद आपण बाहेर शोधतो — जो बाहेर नाहीच त्याला शोधून काय उपयोग!!

दुसऱ्यांना ध्यानात ठेवून कर्म केलीत तर आपण "चांगले वाटतो थोड्या लोकांना!!" परंतु आपले काही थोड्या लोकांना "चांगले वाटणे" बाकीच्यांना "चांगले वाटत" नाही. आणि इथून सुरु होतो संघर्ष! ह्या दुनियेशी आणि अधिक महत्वाचा तो म्हणजे "स्वतःशीच!!"

''जगाने तुम्हाला पाहायला हवे म्हणून पर्वताच्या शिखरावर जाऊ नका. पर्वताच्या शिखारवर ह्यासाठी जा कारण की तुम्हाला जग पाहायचे आहे...'' 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना