शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
3
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
4
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
5
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
6
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
7
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
8
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
9
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
10
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
11
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
12
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
13
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
14
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
15
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
16
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
17
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
18
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
19
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मन साफ, तर सर्व माफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 15:53 IST

आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरवण्याचे अधिकार कुणालाही देऊ नका

      नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला... कारण सतत मागच्या गोष्टींचा विचार करत राहिलात, तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावर होत असतो...      लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही... कारण पाठीमागे लोकं तर राजाला सुध्दा शिव्या देत असतात...     प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेच... काळाच्या ओघात सगळ्या गोष्टींवर उपाय सापडतो... त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो...     स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतरांविषयीचे मत बनवू नका... कारण त्यांच्या आयुष्यातील वादळे आणि संकटांची तुम्हाला कल्पना नसते...     अतिविचार करीत बसू नका... काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी असतात... कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील...     तुमच्या आनंदाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात... आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरवण्याचे अधिकार कुणालाही देऊ नका... पोट दुखेपर्यंत हसा... लक्षात ठेवा, जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर दिलेला (ठेवलेला) नाही....      सुंदर डोळ्यांसाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टींकडेच पहा... सुंदर ओठांसाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा... कधीही आपण एकटे नाही, याची जाणीव ठेवा... आयुष्याच्या वाटेवर चालत राहून आनंदाने जगा...     कधीकधी केराचा डबाही आपल्याला मनापेक्षा बरा वाटतो... कारण तो दिवसातून एकदा का होईना निदान रिकामा तरी होतो...     आपण मात्र मनात कितीतरी दुःखद आठवणी साठवतो... काय मिळवतो यातून आपण?... आपणच स्वतःचे दुःख वाढवत राहतो... घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो... त्या ज्या गोष्टीमुळे घडल्या त्यांचा पुढे आपणच तिरस्कार करतो...     आता केराच्या डब्यासारखंच दररोज आपलं मनही साफ करायचं... जुने दु:ख विसरून सारे नवीन स्वीकारायचे... नव्या सुखांना त्यात आनंदाने भरायचं...      सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं... स्वतः नेहमीच आनंदी रहायचं... आणि दुसर्‍यांनाही आनंदी ठेवायचं..जसे झाड आपल्या वर कुऱ्हाड चालवणाऱ्या लोकांना देखील शुद्ध हवा व सावली देऊन आपला चांगला गुणधर्म सोडत नाही त्याच प्रमाणे आपण देखील करणे गरजेचे आहे.यामुळें      एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा... आपलं मन साफ ठेवा, कुणाबद्दल राग, द्वेष, सुडबुद्धी, तिटकारा, आकस, ठेऊ नका मग पहा आयुष्यात काहीच चुकीचं घडणार नाही, आणि आयुष्य देखील सुंदर होईल.काही चूक नकळत झाली असेल तर माफ करा ।

- शून्यानंद संस्कारभारती

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक