शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

चिंता ही चितेसमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 5:59 PM

चिंता ही चितेसमान असल्याने कुणीही निराश होता कामा नये. भगवंत आणि ही सृष्टी कुणाचेही वाईट करीत नाही. 

जीवनातील अनेक लहान-मोठया प्रसंगांना सामोरे जाताना  मनात खूप चिंता दाटून येते. काही तरी नकोसे होणार आहे, वाईट होणार आहे, मनाविरुद्ध होणार आहे, या भीतीने जीव बेचैन होतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मनुष्याने अजिबात ‘नर्व्हस’होता कामा नये. जीवनात कितीही वाई घडले; वाईट झाले तरी,  संयम आणि वेळेच्या औषधाने एकदिवस सर्वकाही बरे होते. कालांतराने सर्व संकटे ही पुरस्कारच घेवून येतात. असा आत्मानुभव प्रत्येकाला येतो. चिंता ही चितेसमान असल्याने कुणीही निराश होता कामा नये. भगवंत आणि ही सृष्टी कुणाचेही वाईट करीत नाही. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये चिंतेचे प्रमाण जास्त आहे. बºयाच स्त्रिया आपले संपूर्ण  आयुष्य विविध प्रकारच्या चिंतेच्या छायेखाली जगतात. काही स्त्रियांमध्ये या सामान्य वाटणाºया चिंतेचे विविध आजारामध्ये रूपांतर होते. चिंता  ही शरीराला हळुहळु खातं जाते. त्यामुळे सकारात्मक उर्जेने चिंतेला सामोरे जाणं गरजेचे आहे. स्त्रियांनी साºया दु:खाला हसत-हसत  सामोरे गेलं पाहीजे. चिंतेच्या आजारात एखादी न सोसणारी त्रासदायक घटना या लक्षणांची सुरुवात करते. मग ही लक्षणे सोसणेसुद्धा रुग्णास असह्य होते. सांगता येत नाही व सोसतही नाही असे अवघड दुखणे म्हणजे चिंतेचा आजार. म्हणूनच चिंतेबाबत स्वत:शी तर्क करत बसण्यापेक्षा तणाव वा चिंता कमी करणं हाच सर्वात उत्तम उपाय आहे. जीवनात अनेकदा जे वाईट झाल त्याचा स्वीकार करून पुढे जाव लागत. हे झाल आहे, आणि ते बदलू शकत नाही. परंतु मी जीवनात पुढे जाऊ शकतो, आणि मी जाणार.    या सकारात्मक विचारांनीच जीवनात सर्व समस्यांना सामोरे गेलं पाहीजे. आयुष्यात अनेक जण अनेक लोक अपयशी झालेत. मात्र, त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. तसंच चिंता सोडल्यास मनुष्य सुखी होवू शकतो.  दुर्घटना आपल्या जीवनात दु:खाच कारण नाही, तर दु:ख झेलू शकण्याची योग्यता नसणं हे दुख:च कारण आहे. 

- शुभांगी नेमानेशिर्ला नेमाने, ता. खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक