शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आनंद तरंग: शांती परते नाही सुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 02:08 IST

दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत.

प्रा. शिवाजीराव भुकेले

शांती नावाच्या स्फटिकगृहातील डोलणारे अजातशत्रू दीपक म्हणजे संत होत. समता, ममता आणि शांती ही संताच्या जीवनातील त्रिवेणी होती. संसारात घडणाऱ्या नाना घटनांनी संताच्या मनाची शांती कधी विचलित झाली नाही. भ्रांतक्रांत व गलितगात्र झालेल्या समाजाला सन्मार्गाचा व सुसंस्काराचा उजेड दाखविण्याचे काम शांती नावाचा सद्गुण करतो. नदीचा प्रवाह हा जसा स्वाभाविकपणे सागराकडे जाण्यासाठी प्रवाहित होतो, सूर्यफूल जसे सूर्याच्या तेजाकडे तोंड करून बसते अन् आपल्या पिवळ्या धम्मक सगुण रूपाचा साक्षात्कार देते, चकोर जसे चंद्राकडे अमृतकणाची आस करण्यासाठी आपली चोच उघडून बसतात तसे संत भगवंताकडे शांत व संयमी जीवनाचे दानङ्कमागतात. कारण शांती हेच जगातील सर्वोत्तम सुख आहे. शांत-शांत जलाशयात जसे चंद्रासहीत स्वत:चे प्रतिबिंंब न्याहाळता येते अगदी तसेच शांत-शांत मनरूपी सरोवरात जीवत्वाचे भाव गळून जातात आणि शिवत्वाकडे वाटचाल सुरूहोते. निंदा-अवज्ञा-उद्धटपणा यांचे अडथळे जीवनरूपी रस्त्यावर वारंवार येणारच; पण या अडथळ्यांना पार करून जो अडथळा आणणाऱ्यांचे अहित चिंतित नाही तो शांतीचा प्रत्यक्ष पुतळा असतो. दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत. कारण मानसिक शांती हाच तर संताचा स्थायीभाव होता. शरीराच्या पसाºयातील आपलाच हात अन् पाय आपल्याच अंगावर आदळला म्हणून आपण त्याला कधी कापून टाकत नाही. समाजात अगदी तसेच आहे म्हणून संत जगाचे आघात अगदी शांतपणे सहन करतात. शांती हेच परमसुख आहे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात -

शांती परते नाही सुख। येर आवघेचि दु:ख।म्हनवूनि शांती घरा। उतराल पैलतीरा।खवळलीया कामक्रोधी। अंगी भरती आधीव्याधी।तुका म्हणे विविध ताप। जाती मग आपोआप॥वैषयिक सुखाच्या पाठीमागे लागलेल्या आजच्या भयग्रस्त जीवनात शांती परते सुख नाही. केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतता धोक्यात येत आहे. आंचन, कांचन, करवंदीने भरलेला, ऋषीमुनींच्या शांतीघोषाने दुमदुमणारा आपला भारत देश चहूबाजूने अशांत होत आहे. अशा वेळी धीर धरा रे, धीरापोटी शांती उपजेल गोमटी असा संदेश देणाºया संत विचारांची आज खरी गरज आहे. जेथे शांती नसते तेथे संसारिक असो वा पारमार्थिक असो अशा शांत-सुखाला कधी थाराच मिळू शकत नाही. शांततेच्या अभावाने आत्मविश्वास ढळतो आणि आत्मविश्वास ढळलेल्या जगात हिंसेच्या आणि भयाच्या नरसंहारक लाटा उसळत असतात. म्हणूनच विचारवंत आजही संदेश देत आहेत की, आता युद्ध नको बुद्ध हवा. समाज जीवनाला अधिभौतिक आधिदैविक व आध्यात्मिक तापांनी तप्त केले आहे त्यावर आपल्या हृदयस्थ शांतीचेच शिंंपण करायला हवे. जगात इतर प्रत्येक विषयांचा अंत दु:खांत आहे; पण शांतीचा अंत मात्र सुखांत आहे. परंतु, आज इतर प्राणिमात्रांनी माणसाचा शत्रू होण्यापेक्षा माणूसच झालाय माणसाचा वैरी. दुसºयाला नष्ट करण्याच्या कुविचारांचे गिधाडे आणि घारी आकाशात नव्हे, तर माणसाच्या डोक्यात घिरट्या घालत आहेत. जिकडे-तिकडे हिंंसेच्या ज्वाला उफाळत आहेत. मानवतेची राख-रांगोळी होत आहे. अशा वेळी शांतीला परब्रह्म मानणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात -शांती तोचि समाधान। शांती तोचि ब्रह्मज्ञान ।शांती तोचि ब्रह्म पूर्ण। सत्य जाण उद्धवा ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक