शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आनंद तरंग: एकमेकां सहाय्य करू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 00:10 IST

आर्थिक महासत्तेसाठी युद्धजन्य स्पर्धा चालू होती. त्यासाठी आर्थिक समृद्धी व तुलना हेच निकष वापरले जात होते

फा. फ्रान्सिस दिब्रिटोकाही वर्षांपूर्वी एक बंगाली चित्रपट पाहिला होता. ‘एक्सेस टू सक्सेस’ म्हणजे ‘यशाकडे वाटचाल’ असं त्याचं नाव होतं. काय असते हे यश! आध्यात्मिक जीवनात सर्व सिद्धी प्राप्त होणे, जीवन निरिच्छ व निरामय होणे यालाच यश म्हटले जाते. भौतिक जीवनात मात्र कमविण्यात, जमविण्यात व इतरांपेक्षा अधिक मिळविण्यात यश समजले जाते. उंच टॉवरच्या चोविसाव्या मजल्यावरील सदनिका मिळविणे हे ‘त्या’तील नायकाचे स्वप्न होते. कष्ट, जिवाचा आटापिटा करून घेतलेल्या सदनिकेचा ताबा घेण्यासाठी तो टॉवरमध्ये जातो; पण काही मजले गेल्यावर लिफ्ट बंद पडते. उरलेले जिने चढत तो सदनिकेच्या दाराशी पोहोचतो. दरवाजाला चावी लावताच दुर्दैवाने तो खाली कोसळतो व क्षणार्धात गतप्राण होतो. बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे सारं जग जिंकलं; पण आत्मा गमावला तर काय अर्थ? जगाने दोन संहारक महायुद्धे अनुभवली आहेत. तिसरे शीतयुद्ध चालू होते व आजही आहे.

आर्थिक महासत्तेसाठी युद्धजन्य स्पर्धा चालू होती. त्यासाठी आर्थिक समृद्धी व तुलना हेच निकष वापरले जात होते. नीती, माणुसकी यांना थारा नव्हता. काही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या अतिसंपन्न झाली; तर काही गरीब राहिली. त्यांच्या गरिबीची कारणे म्हणजे बड्या राष्ट्रांनी त्यांचे केलेले शोषण, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या केलेली लूटमार. आपली पोळी भाजण्यासाठी राष्ट्रा-राष्ट्रांत लावून दिलेली भांडणे, शस्त्रनिर्मिती व विक्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांचा लेखाजोखा करायचा तर मानवाच्या हाती काय गवसेल? आर्थिक सामर्थ्य हा प्रश्न सोडवू शकतो का? तसे असते तर आज अमेरिकेत मृतदेहांचा सडा पडला नसता. या महासंकटाशी मुकाबला करताना आपण काही शिकणार आहोत का? आपल्याला अध्यात्माकडे वळावे लागेल. ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हा याचा सुवर्णमार्ग आहे. विकसनशील देशांना जगवायचे कसे? त्यांना आपल्या पातळीवर आणायचे कसे याचा विचार होऊन तशी कृती झाली तरच ‘करोना’पासून खूप काही शिकलो असे म्हणता येईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक