शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 2:07 AM

भगवद्गीतेतला ८ व्या अध्यायातला २४वा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अग्नी, ज्योती म्हणजे ज्वाळा, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे ६ महिने, यात मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्यावर ब्रह्मास पोचतात.

- शैलजा शेवडे

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।तत्र प्रयाता गच्छिन्त ब्रह्म ब्रह्मविदो जना:।।भगवद्गीतेतला ८ व्या अध्यायातला २४वा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अग्नी, ज्योती म्हणजे ज्वाळा, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे ६ महिने, यात मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्यावर ब्रह्मास पोचतात. इच्छामरणी भीष्माचार्यांनी शरपंजरी पडलेले असतांनाही उत्तरायणाची वाट का पहावी. मला खरोखरच प्रश्न पडला होता. उत्तरायणात मृत्यू पावल्याने काय होते, तर मोक्ष मिळतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. कसला अग्नी, कसली ज्योत. काही कळत नव्हते. पण माझ्या मदतीस ज्ञानेश्वरी आली. त्यात लिहिले आहे, भगवद्रूप होणे आणि जन्ममरणाच्या फेºयात सापडणे, ही दोन्ही ठराविक मरणवेळेच्या आधीन आहेत. मृत्यू समय आल्यावर शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात. ब्रह्मिस्थतीला प्राप्त केले असता मरणकाळ प्राप्त झाला असतांना बुद्धीला भ्रम गिळत नाही. स्मरणशक्ती आंधळी होत नाही. आणखी मन मारत नाही. याप्रमाणे हा सर्व इंद्रियसमुदाय मरणसमयी टवटवीत असतो. हा त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे केवळ अग्नीचे सहाय्य असेल, तर घडेल. वाºयाने, किंवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, तेव्हा शाबूत असलेली आपली दृष्टी कशी पाहू शकेल. देह पडण्याच्या वेळी त्रिदोषाने देह आतबाहेर कफाने व्यापला जातो, अग्नीचे तेज निघून जाते. त्यावेळी प्राणास क्रियाशक्ती नसते. अर्चिरादि किंवा ज्योतिरादि मार्ग हा आरंभापासून अखेरपर्यंत उजेडाचा आहे. ज्ञान हे प्रकाशमय व परब्रह्म हे ज्योतिषां ज्योति: म्हणजेच तेजाचे तेज असल्यामुळे देहपातानंतर ज्ञानी पुरुषांचा मार्ग प्रकाशमय असणारच....!

टॅग्स :spiritualअध्यात्मिक