शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

‘ग’राड्याचे निवारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:20 IST

त्या सज्जन मित्राने मला आकर्षित केलं, तो आजही भलताच जागृत आहे. स्वत:कडे खूप लक्ष देतो, सकाळी ध्यान लावून मनाला नको त्या त्रास देणाऱ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकतो.

- विजयराज बोधनकरत्या सज्जन मित्राने मला आकर्षित केलं, तो आजही भलताच जागृत आहे. स्वत:कडे खूप लक्ष देतो, सकाळी ध्यान लावून मनाला नको त्या त्रास देणाऱ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. दिवसाची सुरु वात सकारात्मक कशी होईल याचा मनात आराखडा तयार करतो. त्यानुसार पूर्ण दिवसभर काम करतो, रात्री आनंदाने झोपतो. यात त्याची एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे तो मनाला त्रास देणाºया गोष्टी डोक्यातून काढून टाकतो, म्हणजे तो नेमकं काय करतो हे जेव्हा त्याच्याकडून समजून घेतलं तेव्हा ते जास्त महत्त्वाचं वाटलं. तो उगाच वायफळ बडबड करणाºया मित्र परिवार आणि नातेवाइकापासून स्वत:ला वाचवतो. बुद्धीचा वापर न करणारे, लॉजिकली न बोलणारे त्याला आयुष्यात पराजित झालेली माणसं वाटतात. इतरांचा सतत अपमान करणारे, सामान्य गोष्टीसाठी खोटं बोलणारे, पुढे जाणाºया व्यक्तींना मागे खेचणारे, कुठलाही सत्याचा आधार नसताना कुणाविषयी सतत खोटा प्रचार करणारे, इतरांविषयी गैरसमज निर्माण करणारे, चांगले वर्तन असणाºया स्त्री-पुरुषांना सतत बदनाम करण्याची संधी शोधणारे, यशस्वी माणसांचा द्वेष, मत्सर करणारे. अशा अनेक वाईट गोष्टी करत जगणाºया व गची बाधा झालेल्या माणसांच्या गराड्यापासून तो सतत वाचवत असतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात कधीच दु:खमय प्रसंग येत नाही. त्याला अशी माणसे चटकन ओळखता येतात. आयुष्य जगताना काटे आणि फुले कुणाच्या मनात दडलेली असतात हे ओळखणेसुद्धा एक कला असते. यात सफल होतो तो स्वत:चा विकास करत कुठलाही भ्रष्टाचार न करता घवघवीत यश प्राप्त करू शकतो, हेच तर भगवत गीतेत सांगितले आहे. गीता ही कर्मातून फुलते, जगताना अर्जुनाची भूमिका स्वीकारताना मन आणि बुद्धीला कृष्ण म्हणून स्वीकारलं तर विकृतीच्या ‘ग’राड्यात माणूस कधीच अडकू शकत नाही, याची ग्वाही स्वत: स्वत:ला माणूस देऊ शकतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक