यवतमाळ निवडणूक निकाल; यवतमाळमध्ये चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 09:48 AM2019-10-24T09:48:36+5:302019-10-24T09:49:44+5:30

Maharashtra vidhan sabha election Results 2019; यवतमाळमध्ये कुठे भाजप तर कुठे काँग्रेसची मुसंडी

Yawatmal Election Results 2019; Namdev Sasne Vs Vijay Khadse, Indranil Naik Vs Nilay Naik, Shivajirao Moghe Vs Sandip Durve | यवतमाळ निवडणूक निकाल; यवतमाळमध्ये चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे

यवतमाळ निवडणूक निकाल; यवतमाळमध्ये चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या १३ व्या निवडणुकीच्या मतांची मोजणी सुरू झाली असून, यवतमाळ जिल्ह्यात आपले नशीब आजमावत असलेल्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
उमरखेड विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत भाजपाचे उमेदवार नामदेव ससाने हे ४२ मतांनी आघाडीवर होते. ससाने यांना ३४८० तर काँग्रेसचे विजय खडसे यांना ३४३८ एवढी मते मिळाली होती. पुसत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील मनोहर नाईक हे साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ९५५७ मते होती तर भाजपचे निलय नाईक यांना ६२३५ मते मिळाली होती.
आर्णी मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजीराव मोघे आघाडीवर आहेत तर संदीप धुर्वे व राजू तोडसम हे पिछाडीवर आहेत. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे मदन येरावार ३५० मतांनी आघाडीवर. भाजप २७७८, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर २४१७ तर शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांना १६११ मते आहेत.

Web Title: Yawatmal Election Results 2019; Namdev Sasne Vs Vijay Khadse, Indranil Naik Vs Nilay Naik, Shivajirao Moghe Vs Sandip Durve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.