पाण्यासाठी उपविभागातील ग्रामीण नागरिकांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:34 PM2019-04-16T22:34:54+5:302019-04-16T22:35:18+5:30

वणी उपविभागातील वणीसह मारेगाव व पांढरकवडा उपविभागातील झरी या तीन तालुक्यातील ग्रामीण नागरिकांची पाण्यासाठी अक्षरश: होरपळ सुरू आहे. दरवर्षी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने या नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही.

Water Resource | पाण्यासाठी उपविभागातील ग्रामीण नागरिकांची होरपळ

पाण्यासाठी उपविभागातील ग्रामीण नागरिकांची होरपळ

Next
ठळक मुद्देउपाययोजना कागदोपत्री : शेतातून ड्रमद्वारे आणावे लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी उपविभागातील वणीसह मारेगाव व पांढरकवडा उपविभागातील झरी या तीन तालुक्यातील ग्रामीण नागरिकांची पाण्यासाठी अक्षरश: होरपळ सुरू आहे. दरवर्षी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने या नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. झरी या आदिवासीबहुल तालुक्यातील नागरिकांची अवस्था अतिशय बिकट आहे.
ज्या गावातील पाण्याचे स्त्रोत आटले, त्या गावातील नागरिकांना बैलबंडीवर ड्रम ठेऊन त्याद्वारे दूरवरच्या शेतातील विहीर अथवा अन्य स्त्रोतातून पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. म् मागील वर्षी वणी तालुक्यातील कुर्ली, पिपरी कायर या दोन गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. यंदा मार्च महिन्यानंतर वणी तालुक्यातील वडगाव (टिप), कुर्ली, पिंपरी (कायर), वरझडी (बंडा), गोपालपूर, खांदला, गोपालपूर (वरझडी) या सहा गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. या टंचाईवर मात करण्यासाठी बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आल्या. मात्र त्या तोकड्या ठरत आहे.
ग्रामपंचायतींची उदासीनता
झरी आणि मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायतींनी टंचाईसंदर्भात पंचायत समितीकडे प्रस्तावच पाठविला नसल्याचे वास्तव आहे. मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) येथील नागरिकांनी गावातील पाणी टंचाईच्या मुद्यावरूनच मतदानावर बहिष्कार टाकला होता, हे विशेष. झरी तालुक्यात अद्याप एकाही गावातून पाणीटंचाई संदर्भात प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आला नाही. तालुक्यातील शिबला, निमणी व इतर पठार भागातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. झमकोल, निमणी, वल्लासा, राजनी शिबला, रामपूर, हिरापूर (जुने) अशा काही गावांत पाणी टंचाईचे सावट आहे. अनेक गावांत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास मोठी समस्या निर्माण होते.

नियम डावलून बोअरवेलचे खोदकाम
गेल्या काही वर्षांत पर्जन्यमान अल्प राहत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी २०० किंवा त्यापेक्षा अधिक फुटावरच पाणी लागत आहे. मात्र नियमानुसार २०० फुटापेक्षा अधिक खोलीची बोअरवेल खोदता येत नाही. मात्र पाणी टंचाईमुळे अनेकजण २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेलचे खोदकाम करीत आहेत.
 

Web Title: Water Resource

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.