धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तर सोडत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:13 PM2019-05-08T22:13:40+5:302019-05-08T22:14:54+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. उपरोक्त छायाचित्रांमधून त्याचे पुरावे मिळत आहे. परंतु त्यानंतरही जीवन प्राधिकरण यवतमाळ शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाण्याचा पुरवठा करीत नाही.

There is plenty of water in the dams, why not quit? | धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तर सोडत का नाही?

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तर सोडत का नाही?

googlenewsNext
ठळक मुद्देसंतप्त यवतमाळकरांचा सवाल : नियोजनाच्या नावाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कृत्रिम पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. उपरोक्त छायाचित्रांमधून त्याचे पुरावे मिळत आहे. परंतु त्यानंतरही जीवन प्राधिकरण यवतमाळ शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाण्याचा पुरवठा करीत नाही. नियोजनाच्या नावाखाली प्राधिकरण शहरात खुलेआम कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत असल्याचे स्पष्ट होते. त्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
यवतमाळ शहराच्या सभोवतालीच नव्हेतर मध्यभागातसुद्धा नागरिक भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. कुठे आठवड्यातून एक दिवस तर कुठे दहा-बारा दिवसातून एक दिवस पाणी मिळते आहे. तेही पूर्ण दाबाने मिळत नाही. पाणी भरणे होण्यापूर्वीच नळ निघून जातात, अशी स्थिती आहे. एक तर रात्री-बेरात्री नळ येतात. त्यात आठवड्यातून एकदा पाणी येत असल्याने साठवणूक करायची कशी, याचा प्रश्न शहरवासीयांपुढे निर्माण झाला आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा दिसत असताना प्राधिकरण आठवड्यातून किमान दोन दिवस नळ का सोडत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहर व जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाºया सत्ताधारी राजकीय नेत्यांनी प्राधिकरणाकडून तत्काळ पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा लेखाजोगा घेऊन त्यांना नियमित पाणीपुरवठ्याचे निर्देश द्यावे, बेंबळाचे पाणी नेमके केव्हापर्यंत मिळेल, त्यात खरोखरच काय अडचणी आहे, हेसुद्धा माध्यमांपुढे येऊन जाहीर करावे, अशी शहरवासीयांची मागणी आहे. मुबलक पाणी असूनही नागरिकांना कृत्रिम टंचाईचा सामना करायला लावणाऱ्या, नागरिकांचे फोन न उचलणाºया प्राधिकरण अभियंत्यांवर कारवाईची मागणी आहे.
अमृत योजनेतील बेंबळाच्या पाण्याबाबत कुणीच अधिकृत बोले ना
यवतमाळ शहराच्या दृष्टीने अमृत योजना महत्त्वाची आहे. या योजनेंतर्गत बेंबळा प्रकल्पावरून शहरासाठी पाणी आणले जाणार आहे. परंतु या योजनेला निकृष्टतेचे ग्रहण लागले. पर्यायाने आॅक्टोबर-२०१९ ही योजनेची डेडलाईन तोंडावर येऊनही अद्याप कामाचा थांगपत्ता नाही. राजकीय दबावात जीवन प्राधिकरणाचे अभियंते लवकरच शहराला बेंबळाचे पाणी मिळेल, असे सांगतात. परंतु तारीख सांगत नाही. विशेष असे, हेच अभियंते खासगीत मात्र योजनेचे काही खरे नाही, असे बोलताना दिसतात. अमृत योजनेची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत अधिकृतपणे कुणीच समोर येऊन काही सांगण्यास तयार नाही. प्राधिकरणाचे अभियंतेही माध्यमांशी बोलताना ‘आॅफ द रेकॉर्ड’ हा शब्द वापरूनच पुढे बोलतात. राजकीय स्तरावरून सत्ताधारी पक्षाच्या नेते-पदाधिकाऱ्यांनी अद्याप तरी अमृत योजनेची सद्यस्थिती जाहीररित्या सांगण्याइतपत हिमत जुळविलेली दिसत नाही. जाहीर आवाहन करूनही कुणीच काही बोलत नसल्याने अखेर शहरातून १० मे रोजी आंदोलनाची तयारी केली जात आहे. पोलीस व गुप्तचर यंत्रणा या संभाव्य आंदोलनाच्या दृष्टीने ‘अलर्ट’ झाली आहे. संभाव्य आंदोलन हाणून पाडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या या यंत्रणेने ‘गनिमी काव्याने’ तर आंदोलन होणार नाही ना, याचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसते. ही यंत्रणा आंदोलनाची घोषणा करणाºयांवर सातत्याने वॉच ठेऊन आहे. आता पोलिसांच्या सतर्कतेनंतरही आंदोलन होते काय अन् जनता त्यात सहभाग घेते काय याकडे नजरा लागल्या आहेत.
प्राधिकरण अभियंत्यांचा कॉलला ‘नो रिस्पॉन्स’
अमृत योजनेची नेमकी स्थिती काय, धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा दिसत असताना तो नियमित सोडला का जात नाही, नेमक्या काय अडचणी आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना ‘कॉल’ केला. मात्र प्रश्नांना उत्तरे द्यावी लागेल, या भीतीने त्यांनी तो ‘रिसिव्ह’ केला नाही. जनतेला तर प्रत्यक्ष जाऊनही अभियंत्यांचे दर्शन होत नाही.

Web Title: There is plenty of water in the dams, why not quit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.