सीबीएसई बारावीत वणी, घाटंजीचे विद्यार्थी चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:33 PM2018-05-26T22:33:54+5:302018-05-26T22:34:02+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील वणी आणि घाटंजी येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. वणीचा मोहित अग्रवाल हा विद्यार्थी ९२.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात टॉपर ठरला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Students of CBSE, XV, Ghatanji shine | सीबीएसई बारावीत वणी, घाटंजीचे विद्यार्थी चमकले

सीबीएसई बारावीत वणी, घाटंजीचे विद्यार्थी चमकले

Next
ठळक मुद्देमोहित अव्वल : नवोदयचा निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील वणी आणि घाटंजी येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. वणीचा मोहित अग्रवाल हा विद्यार्थी ९२.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात टॉपर ठरला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
वणी शहराला लागूनच असलेल्या स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा निकाल ९१ टक्के लागला. येथून ६५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. मोहित अग्रवाल याने ९२.६ टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला क्रमांक पटकावला. तर ९१.४ टक्के गुण घेऊन श्रद्धा छाजेड दुसरी ठरली. शाळेचे अध्यक्ष क्रिशन जैन, सचिव नरेश जैन, प्राचार्य शिवराम कृष्ण यांना विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय दिले.
बेलोरा (ता.घाटंजी) येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. येथून एकूण ४६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातून ३३ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. १२ जण प्रथम श्रेणीत तर एक विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. विद्यालयातील प्रवीण गणेश जाधव हा विद्यार्थी ८७.६० टक्के गुण प्राप्त करून प्रथम स्थानावर आला. वैभव प्रमोद किन्हेकर हा ८७ टक्के गुणांसह द्वितीय तर राजहंस प्रमोद घुगरे हा ८६.८० टक्के गुण घेऊन विद्यालयातून तृतीय आला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य गंगाराम सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी व सर्व शिक्षकवृंदांना दिले.

Web Title: Students of CBSE, XV, Ghatanji shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.